HomeनांदेडDraft ward formation program : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

Draft ward formation program : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचना 14 जुलै 2025 रोजी परिशिष्ट 5 (अ) व 5 (ब) मध्ये पुढील ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, जिल्हा परिषद नांदेड यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित तहसिल कार्यालयाच्या बोर्डावर, संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेस मसुद्यास कोणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व संबंधित तहसिल कार्यालय येथे 21 जुलै 2025 पर्यत सादर करावेत. त्यानंतर आलेली निवेदने, हरकती, सूचना इत्यादी विचारात घेतली जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments