HomeनांदेडBjp join : राष्ट्रवादीचे दिनकर दहिफळे सभापती गजानन मुंडे सहित बाजार समिती...

Bjp join : राष्ट्रवादीचे दिनकर दहिफळे सभापती गजानन मुंडे सहित बाजार समिती संचालकांचा भाजपात जाहीर प्रवेश !

किनवट, परमेश्वर पेशवे| गत पंधरा वर्षाच्या राजकीय वर्तुळात मोठा फेरबदल घडून आला असून किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार एक विकसनशील नेतृत्व भीमराव केराम यांचा सर्व समावेशक विकासावर प्रभावित होऊन आज मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण, भाजपा महामंत्री विक्रांत पाटील, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, आमदार तुषार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वात मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रियपणे प्रवेश केला आहे.

असे मत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकर दहिफळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन गोविंदराव पाटील मुंडे यांनी मांडले. व त्यांचे सहकारी बाजार समितीच्या संचालकांनीही भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अखेर आमदार भीमराव केराम यांना राष्ट्रवादी शरद पवार गटातील दिग्गजांचा भाजपा गोटात प्रवेश करून घेण्यात मोठे यश मिळाले,अशा भावना उमटत असून हा एक गतकाळातला राजकीय वर्तुळातील मोठा भूकंप म्हणावा लागेल. या पक्षप्रवेशाच्या घडामोडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत सविस्तर असे की, स्वर्गीय आमदार प्रदीप नाईक यांच्या अकाली निधनानंतर पक्षाला नेतृत्वाची कमी भासत होती. अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. यामुळे अनेक राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांचा भाजपा पक्षप्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. पक्षप्रवेशाच्या चर्चेला उद्यान आले होते. परंतु आज तो खरा दिवस उजडला, आणि अखेर पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम झाला. यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद नांदेड चे माजी सभापती दिनकर दहिफळे हे किनवट माहूर विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील दिग्गज व चाणाक्ष राजकारणी म्हणून परिचित होते.

आणि अत्यंत प्रभावीपणे आपल्या लोकोपयोगी विचाराचे, दिन, गरीब, दलितांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गजानन पाटील मुंडे यांचाही झालेला भाजपा पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्यासोबत युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे, सुनील घुगे, श्रीराम कांदे,प्रल्हाद सातव, कैलास बिजमवार,कुसुमताई मुंडे, विद्याताई दासरवार,माधव मुंडे, शिवाजी मुंडे सहित इत्यादी सहकारी कार्यकर्त्यांनी भाजपा मधे जाहीर प्रवेश केला आहे.

लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेबांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचा भाजपा प्रवेश-
किनवट माहूर विधानसभेतील लोकनेते लोकप्रिय आमदार भीमराव केराम साहेबांचे कार्य आम्ही गत आठ वर्षापासून पाहत आहोत. सर्वसामान्याच्या मूलभूत सुविधेसाठी आणि तळागाळातील शेवटच्या टोकापर्यंत होत असलेला सर्वांगीण विकास, हा आम्हाला प्रभावित करीत होता. त्यासाठी आपल्या भागाचा विकास व्हावा आणि तो माननीय आमदार भीमराव केराम साहेबांच्या नेतृत्वातच शक्य होणार आह.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांचाही आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या सहकार्यांना सोबत घेऊन जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. दिनकर दहिफळे मा. अध्यक्ष,नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तथा माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड, गजानन गोविंदराव पाटील मुंडे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट यांनी सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments