HomeनांदेडIndira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत...

Indira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा

नवीन नांदेड l मराठवाड्याचे जलप्रणेते, माजी केंद्रीय गृहमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून श्री .शारदा भवन शिक्षण संस्था संचलित इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.एम. शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश रवंदे,पोलीस कॉन्स्टेबल वाकोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, पुष्पहार आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. यात कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नुकतीच दोन्ही हाताने दिव्यांग असतानाही एमपीएससी मार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या वैभव शिवकुमार पइतवार व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेली ज्योती पाटावकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

बारावी बोर्ड परीक्षा 2025 मध्ये घवघवीत यश संपादन केलेले महाविद्यालयातील विद्यार्थी कु. दिपाली उडतेवार,कु वैदेही भरकड, कु. शिवानी ढगे, कु.अश्विनी मोकले, राज्यस्तरीय खेळाडू नागेश बोंबले आदी विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक श्री गायकवाड, प्राचार्य डॉक्टर दुर्गेश रवंदे, क्रीडा शिक्षक डॉ. रमेश नांदेडकर, व्याख्याते प्रा. नितीन दारमोड यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा.यु.सी चंदेल, प्रा.एस.डी शिंदे, सौ.प्रा. झेड.एस.फाजगे, डॉ.आर. टी.नांदेडकर,डॉ.एस.एम. देशमुख, सौ.प्रा. एस.डी. कोठोळे, प्रा.एस .आर. सातानुरे, प्रा.एन.डी.दारमोड, प्रा.डी.एम मोरे, प्रा.एस.आर. हापगुंडे, प्रयोगशाळा सहाय्यक सतीश कुकुटला, लिपिक स्वप्निल पाताळे, सेविका सौ स्वामी बाई यांनी अथक परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments