HomeनाशिकChaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट...

Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

नांदेड| नागरिकांच्या सुरक्षितता व सुविधा लक्षात घेता एक महत्त्वाचा प्रस्ताव माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. दोन मुख्य मुद्द्यांचा समावेश असलेल्या या प्रस्तावामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा (बु.), तरोडा (खु.) व सांगवी येथील कॅनाल रोडवरील लाईट सुरू करण्यात व्यावेत अशी मागणी माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी केली आहे.

चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग वॉकिंग ट्रॅकवर लावलेली झाडे काही अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे व गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅकच्या बाजूंने लोखंडी जाळीचे कुंपण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकून राहील तसेच सकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता व सुविधा वाढेल. गेटची व्यवस्था शिवमंदिर व कामगार पुतळा सांगवी येथे करण्यात यावी, अशी सूचना देखील सतीश देशमुख यांनी केली आहे.

तरोडा (बु.), तरोडा (खु.) व सांगवी येथील कॅनाल रोडवरील गेल्या अनेक दिवसांपासून सेन्ट्रल लाईट बंद आहेत, ज्यामुळे अंधार पसरलेला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे लाईट त्वरित सुरु करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग, नांदेड यांना दिलेल्या या प्रस्तावात करण्यात आली आहे.या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा असून, नागरिकांच्या सुरक्षितता आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे असे मा. उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी म्हटले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments