Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा
नांदेड| नागरिकांच्या सुरक्षितता व सुविधा लक्षात घेता एक महत्त्वाचा प्रस्ताव माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. दोन मुख्य मुद्द्यांचा समावेश असलेल्या या प्रस्तावामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा (बु.), तरोडा (खु.) व सांगवी येथील कॅनाल रोडवरील लाईट सुरू करण्यात व्यावेत अशी मागणी माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी केली आहे.
चैतन्यनगर – शिवमंदिर ते सांगवी दरम्यानच्या वॉकिंग वॉकिंग ट्रॅकवर लावलेली झाडे काही अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे व गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅकच्या बाजूंने लोखंडी जाळीचे कुंपण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकून राहील तसेच सकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता व सु...
