Homeछत्रपती संभाजीनगरMunicipal Elections : राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

Municipal Elections : राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पूर्वतयारीबाबत आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात आज महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील पाचही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोईसुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खाजगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना उपस्थित होते.

निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 26 जून, 2025 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक केलेल्या सोईसुविधांचा आढावा घेऊन सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांनी माहिती दिली. निवडणूक आयुक्त श्री.वाघमारे म्हणाले की, मतदार यादी तयार करणे हेच या निवडणुकीतील महत्वाचे काम आहे. त्या प्रभागातील मतदार त्याच प्रभागात मतदान करतील याकडे मतदार यादीचे विभाजन करताना कटाक्षाने लक्ष द्यावे.

महानगरपालिकांना आवश्यक ईव्हीएमची उपलब्धता करून देण्यात येणार असून साठवणूकीची जागा आणि वापरलेले ईव्हीएम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. निवडणुकीच्या अनुषंगाने वेबसाईट व ॲप अद्ययावत करण्यात आले असून या दोन्हीचा वापर करता येईल. या ॲपचा व वेबसाईचा सर्वसाधारण मतदारालाही वापर करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली. यावेळी निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments