हिमायतनगर| शहराचे ज्येष्ठ राजकीय नेते माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. शेख चांद शेख महेबुब यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. रेखाताई चव्हाण यांनी आज शेख रफिक सेठ यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केलं.


दि. 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी हिमायतनगर शहरातील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शेख रफिक भाई यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व स्व. शेख चांदभाई यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाल्या.


यावेळी त्या म्हणाल्या की, “स्व. शेख चांदभाई यांचे काँग्रेस पक्षाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या क्षणी काँग्रेस परिवार संपूर्णपणे त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे.” या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, बाकी शेठ, हानिप सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




