नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग शिंदे मांजरमकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली आहे.
रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पांडुरंग शिंदे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. शेतकरी चळवळीचा आक्रमक व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा उपयोग निश्चितच पक्ष वाढीसाठी भविष्यकाळात होईल.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रा. जांभरुणकर सर, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, डॉ. दत्ता मोरे,संभाजी पाटील बावलगावकर, शिवाजी पाटील इत्यादी उपस्थित होते.