नांदेड| दिनांक 26 रोजी रात्री 07.45 ते 08.00 वा. चे दरम्यान मामाचौक, उमरी येथे अनिल माधव आडगुलवार, वय 30 वर्ष, रा. रापतवारनगर, उमरी याचा खुन झाला होता. त्या खुनातील आरोपीच्या शोधात पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन अखेर खुनाचे गुन्हयातील तिन आरोपी ताब्यात घेतले आहेत. हि कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 27/12/2024 रोजी पोलीस ठाणे उमरी हद्दीत अनिल माधव आडगुलवार, वय 30 वर्ष, रा. रापतवारनगर, उमरी याचा खुन झाला होता. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उमरी येथे गु.र.नं. 433/2024 कलम 103 (1), 115(2), 351(2) (3), 189(2), 191(2), 191(3), 190 भा.न्या.सं. 2023 सह कलम 135 म.पो.का. प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन, गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते.
त्यावरुन साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक यांनी त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांचेसह गुन्हयातील आरोपीतांच्या शोधासाठी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती घेवुन दिनांक 27/12/2024 रोजी रात्री 20.00 वा. चे सुमारास पिंपळगाव (महादेव), आसना पुल, नांदेड येथुन आरोपी नामे नितेश ऊर्फ एक्का नारायण आडगुलवार, वय 26 वर्ष, रा. रापतवारनगर, उमरी ता. उमरी जि. नांदेड, आशिष बाबुलाल जयस्वाल, वय 26 वर्ष रा रापतवारनगर, उमरी ता. उमरी जि. नांदेड व 3. विश्वनाथ शंकर शिंदे, वय 26 वर्ष, रा. गोरठा रोड, उमरी जि. नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांना गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी दिनांक 26/12/2024 रोजी रात्री 07.45 ते 08.00 वा. चे दरम्यान अनिल माधव आडगुलवार, वय 30 वर्ष, रा रापतवारनगर, उमरी यास त्याचे सोबतचा पुर्वीचा वाद मिटवण्यासाठी मामाचौक, उमरी येथे बोलावुन घेतले.
त्यावेळी मयत हा आरोपी आशिष जयसवाल यास समजावुन सांगत असतांना आरोपी क्र. 1 व 2 यांनी मयतावर खंजरने वार केले व आरोपी के 3 व त्यांचे इतर दोन साथीदारांनी त्यास लाथा-बुक्यांनी मारहाण करुन, त्याचा खुन केल्याचे सांगत आहेत. सदर आरोपीतांना गुन्हयाचे पुढील तपास कामी पोलीस ठाणे उमरी यांचे स्वाधीन केले आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांना गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच ताब्यात घेवुन, स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, प्रशांत संपते, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, साईनाथ व्हि. पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, किशन मुळे, विलास कदम, संतोष बेल्लुरोड, संदिप घोगरे, भिमराव लोणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी केली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.