Umari police arrested three accused : उमरी पोलिसांनी खुनाचे गुन्हयातील तिन आरोपी घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी -NNL
नांदेड| दिनांक 26 रोजी रात्री 07.45 ते 08.00 वा. चे दरम्यान मामाचौक, उमरी येथे अनिल माधव आडगुलवार, वय 30 वर्ष, रा. रापतवारनगर, उमरी याचा खुन झाला होता. त्या खुनातील आरोपीच्या शोधात पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन अखेर खुनाचे गुन्हयातील तिन आरोपी ताब्यात घेतले आहेत. हि कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 27/12/2024 रोजी पोलीस ठाणे उमरी हद्दीत अनिल माधव आडगुलवार, वय 30 वर्ष, रा. रापतवारनगर, उमरी याचा खुन झाला होता. सदर प्रकरणी पोलीस ठाणे उमरी येथे गु.र.नं. 433/2024 कलम 103 (1), 115(2), 351(2) (3), 189(2), 191(2), 191(3), 190 भा.न्या.सं. 2023 सह कलम 135 म.पो.का. प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपीतांचा शोध घेणे बाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड य...
