नांदेड| शेनी पोस्ट देळूब ता. अर्धापूर येथील पीडित संजय गंगाराम हातागळे वय ४५ यांनी दि.२८ डिसेंबर रोजी मौजे शेनी येथे विष प्राशन केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुनीता हातागळे यांनी मयत मुलगा ऋतुराज याच्या मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ९ दिवस आमरण उपोषण आणि सहा महिने साखळी केले तेव्हा कुठे अर्धापूर पोलीस स्थानकात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतत आठ महिने पाठपुरावा केल्या नंतर २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला परंतु आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नाही. काल दि.२७ डिसेंबर रोजी पती पत्नी हातागळे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वजीरबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदींना निवेदन देऊन आरोपीना तात्काळ अटक करावी आणि अटक करण्यास हयगय करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करावी या मागण्यासाठी ३० डिसेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
काल दि.२७ रोजी दोघे पती पत्नी नांवाशमनपा येथे येऊन पूरग्रस्तांचे अनुदान कधी मिळणार म्हणून चौकशी करून गेले असून अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी सांगितले की सोमवार पर्यंत तुमचे सर्व प्रकरण निकाली काढण्यात येईल तसे मी उपायुक्त अजितपालशिंघ संधू व डॉ. बेग यांना सांगितले आहे.
परंतु दुर्दैव म्हणावे लागेल आज सकाळी पाच वाजता पूरग्रस्त तथा पीडित संजय हातागळे यांनी… कीटक नाशक प्राशन केले आहे व मृत्यूशी झुंज देत आहेत.