हदगाव| अखिल भारत पद्मशाली संघम,हैद्राबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभा यांच्या घोषित कार्यक्रमानुसार दिनांक २७/१२/२०२४ रोजी हदगाव येथे पद्मशाली महासभेचे निवडणूक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव तालुका प्रौढ संघटना /महिला संघटना व युवक संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी हदगाव तालुका प्रौढ संघटनेचे अध्यक्ष म्हणून नामदेव काशिनाथ कोंडलवार व महिला संघटना अध्यक्ष म्हणून राजमनी गोविंदराव येमेवार व युवक तालुका अध्यक्ष म्हणून गजानन विजय जिद्देवार आष्टीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी संग्राम निलपत्रेवार -पद्मशाली महासभा नांदेड युवक जिल्हाध्यक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी , विजय वडेपल्ली- राज्य उपाध्यक्ष पद्मशाली महासभा कर्मचारी संघटना नांदेड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी , व्यंकटेश अमृतवार -युवक कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा, भूमाजी मामीडवार-चौधरी सिडको , गणेश गोणे-पद्मशाली महासभा नांदेड दक्षिण उपतालुका अध्यक्ष , बाबू अण्णा पिचकेवार-पद्मशाली महासभा जिल्हा समिती सदस्य तथा माजी नगरसेवक हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर मित्र मंडळ व पदाधिकारी यांच्याकडून नवनियुक्त निवड अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ व निवडीचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले आहे .