हदगाव, शेख चांदपाशा| राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात जुना तालुका म्हणून ओळख असलेल्या 177 गावातील हजारो गावक-याचा हदगाव शहराशी संबध आता राष्ट्रीय महामार्गला आला असल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात विविध समस्यांसह पिण्याच्या पाण्याची अडचण भेडसावत आहे. असे असतांना 47 कोटी रुपयाची योजना थंड बस्त्यात बसल्याने नागरीकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
शहराची लोकसंख्या 30 हजाराच्यावर झालेली असून, हदगाव शहरात 1952 ला नगरपरिषद स्थापन झाली असताना विकास व नागरी समस्याच्या बाबतीत हदगाव शहर कोसो दुर आहे. हदगाव तालुक्यातच्या दृष्टीने औद्योगिक वसाहत करिता 25 वर्षापुर्वी हदगाव शहरा नजिक सुमारे 30 हेक्टर पेक्षाजास्त जागा आरक्षित करण्यात आली होती. भले मोठे लोखडी बोर्ड पण लावण्यात आले असून, विशेष म्हणजे आजतागायत हे बोर्ड आणखी साक्ष देत उभा आहे.
पण उद्योग तर सोडाच त्या जमीनीचे खाजगी भुखडात रुपांतर झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढली असून, होत असलेल्या विकास कामात देखील मोठी हेराफेरी झाल्याने आजघडीला शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. शहराला लागून राष्ट्रीय महामार्ग गेला असला तरी शहर मात्र ओसाड बनत आहे. याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन शहराला स्मार्टसिटी बनविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
हदगाव शहरासह तालुक्यात कोणता ही उद्योग नाही. शहरात मुख्यप्रवेश रोड एकच आहे. तालुक्यात होणारे विकास कामात कमालीचा भ्रष्टाचार वाढलेला आहे. तसेच पाणी पुरवठा योजना रखडल्याने विद्यमान आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडुन हदगाव तालुक्याच्या जनतेला मोठी अपेक्षा आहे. नवनिर्वाचित आमदार साहेबानी तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार, अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावून अवैद्य धंद्यांना हद्दपार करत, एम आय डीसी कार्यन्वित करून कायम पाणी समस्या दूर करण्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.