उस्माननगर| पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारूळ ता.लोहा येथील घरासमोर ठेवलेल्या बजाज प्लसर कंपनीची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान फिर्यादीचे राहत्या घरी एम एच ३६/ सीके ११९२ या नंबरची किंमत ४५.००० हजार रूपयेची नमूद ठिकाणाहून कोणी तरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली.
फिर्यादी शिवशंकर गंगाधर शिंदे रा.बारुळ ता.लोहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे उस्माननगर गुरनं २७७/ २०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून सपोनि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ कुबडे तपास करीत आहेत.