HomeनांदेडPrataprao Patil Chikhlikar prayed : जिल्ह्यात शांतता व बंधुत्व वृद्धिगत व्हावे :...

Prataprao Patil Chikhlikar prayed : जिल्ह्यात शांतता व बंधुत्व वृद्धिगत व्हावे : प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी केली प्रार्थना

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील जनता सुखी समृद्धिगत व्हावी. जनतेत मित्रता, बंधुत्व आणी एकता नांदावी सदैव शांतता प्रस्थापित व्हावी. अशी प्रार्थना लोहा-कंधारचे आमदार मा. प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी शुक्रवारी सकाळी येथील गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब येथे केली. प्रतापराव पाटिल चिखलीकर हे वाढदिवसाच्या औचित्याने सरदार जगबीरसिंघ शाहू यांच्या तर्फे गुरुद्वारात ठेवण्यात आलेल्या श्री अखंडपाठचे दर्शन घेण्यासाठी गुरुद्वारात आले होते. शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे.

गुरुद्वारात सकाळी या पाठाचे समापन व अरदास पार पडणार आहे. श्री चिखलीकर यांनी गुरुद्वारात दर्शन घेतले व त्यांचा सीरेपाव देऊन सत्कार करण्यात आला. नंतर त्यांनी भाई दयासिंघजी भाई धरमसिंघजी यांच्या अंगीठासाहेबचे दर्शन घेतले. तसेच माता भागकौर जी यांच्या तपस्थानचे ही दर्शन घेतले.

आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी दर्शन घेतल्या नंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, येथील धार्मिक स्थान यास दक्षिण काशी म्हणून आपण संबोधतो. या ठिकाणी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त श्री गुरु ग्रंथसाहेबांचे पाठ असते आणी येथे येऊन दर्शन घेतल्याने मला पुढील एका वर्षासाठी ऊर्जा प्राप्त होते. जानतेची कामे करण्याची ऊर्जा अशा पवित्र पावन स्थळी मिळते. आज खूप समाधान वाटले व एक ऊर्जा घेऊन मी जात आहे.

गुरुद्वारा सचखंड बोर्ड तर्फे प्रतापराव पाटिल चिखलीकर यांचे सीरेपाव व स्मृति भेट देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष स. लड्डू सिंघ महाजन, माजी उपाध्यक्ष गुरचरनसिंघ घडीसाज, गुरुद्वाराचे बोर्डाचे माजी सदस्य जगबीरसिंघ शाहू, गुरमीतसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, गुरुद्वारा अधीक्षक गुरबचनसिंघ सिलेदार, गुरुद्वारा सचखंड कर्मचारी पत संस्थेचे अध्यक्ष जगदीपसिंघ लांगरी, सौ. प्रणिताताई देवरे पाटिल, श्री उदय चव्हाण, पप्पू जाधव, गुरप्रीतसिंघ सोखी, इंदरजीतसिंघ संधू, रतनसिंघ त्रिकूटवाले सह राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

IMG 20250801 WA0022 Prataprao Patil Chikhlikar prayed : जिल्ह्यात शांतता व बंधुत्व वृद्धिगत व्हावे : प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी केली प्रार्थना

दोन आमदारांची गुरुद्वारात भेट : शुक्रवारी गुरुद्वारात दोन आमदारांची भेट घडली. प्रतापराव पाटिल चिखलीकर हे वाढदिवसानिम्मित सुरु असलेल्या श्री अखंडपाठ मध्ये हजेरी लावणायासाठी पोहचले होते. योगयोगाने आमदार बोंढारकर हे देखील वाढदिवसा निमित्त दर्शन घेण्यासाठी गुरुद्वारात आले होते. प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी दर्शन झाले होते आणी गुरुद्वाराची प्रदक्षिणा घेत होते. त्याच वेळी आमदार बोंढारकर त्याठिकाणी आले आणी त्यांनी प्रतापराव पाटिल यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी दोन मिनिटं व्यक्तिक चर्चा केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments