HomeनांदेडA. Anandrao Bondharkar ; आ.आनंदराव बोंढारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

A. Anandrao Bondharkar ; आ.आनंदराव बोंढारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

नवीन नांदेड़ l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदराव बोंढारकर यांच्या वाढदिवसा निमित्त परिसरातील पिंपळगाव मीश्री, वडगांव, बळीरामपुर येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले,तर गुरुगोंविद सिघजी अंध विद्यालय धनेगाव येथे अन्नदानाचे वाटप व बळीरामपुर येथे शिवसेना शाखेच्या नाम फलकाचे अनावरण आ.आनंदराव बोंढारकर यांचा हस्ते करण्यात आले.

आ.बोढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर गुरु गोंविद सिघजी अंध विद्यालय धनेगाव येथे अन्नदानाचे वाटप करण्यात आले, यावेळी आ.बोढारकर यांनी अंध मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

कार्यक्रमांचे आयोजक संभाजी पाटील जाधव यांच्या सह ,संभाजीराव पुयड वडगांवकर,मुरली पाटील पुयड पिंपळगांवकर,नांमदेव पाटील पुयड, युवराज पुयड,वैभव जाधव,केशव जाधव, यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून ,बालाजी पाटील भायेगावकर, सुहास पाटील खराणे, तुकाराम पवार वाहेगांवकर,छगन पाटीलपुणेगांवकर, बाळु पाटील ब्राह्मणवाडेकर, प्रभु पाटील पिंपळगावकर,जाधव पाटील वाजेगांवकर, प्रभाकर पाटील धनेगांवकर,पुयड वाडी येथील सरपंच, प्रकाश पाटील सोळंके,काळे पाटील,शाखा प्रमुख केशव पाटील जाधव, शाखा सचिव विशाल गायकवाड, व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments