A. Anandrao Bondharkar ; आ.आनंदराव बोंढारकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
नवीन नांदेड़ l नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदराव बोंढारकर यांच्या वाढदिवसा निमित्त परिसरातील पिंपळगाव मीश्री, वडगांव, बळीरामपुर येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले,तर गुरुगोंविद सिघजी अंध विद्यालय धनेगाव येथे अन्नदानाचे वाटप व बळीरामपुर येथे शिवसेना शाखेच्या नाम फलकाचे अनावरण आ.आनंदराव बोंढारकर यांचा हस्ते करण्यात आले.
आ.बोढारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर गुरु गोंविद सिघजी अंध विद्यालय धनेगाव येथे अन्नदानाचे वाटप करण्यात आले, यावेळी आ.बोढारकर यांनी अंध मुलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
कार्यक्रमांचे आयोजक संभाजी पाटील जाधव यांच्या सह ,संभाजीराव पुयड वडगांवकर,मुरली पाटील पुयड पिंपळगांवकर,नांमदेव पाटील पुयड, युवराज पुयड,वैभव जाधव,केशव जाधव, यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून ,बालाजी पाटील भायेगावकर, सुहास पाटील खराणे, तुक...
