HomeनांदेडVinod Kanchangire ; भाजपा ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे

Vinod Kanchangire ; भाजपा ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे

नवीन नांदेड l नांदेड शहर भाजपा ओबीसी महानगर अध्यक्षपदी ओबीसी चळवळीत सक्रिय योगदान व विविध कार्यात सहभागी होणारे विनोद कांचनगिरे यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे,या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण ,खासदार अजित गोपछेडे,भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, माजी महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या शिफारशीनुसार नांदेड शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष अमर राजूरकर यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे यांच्यी नियुक्ती करण्यात आली.

विनोद कांचनगिरे यांनी मागील कार्यकाळात शिवलिंगेश्वर मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष, दुर्गा माता मंदिर,फ्लोअर मिल असोसिएशन अध्यक्ष,ऊधोग आघाडी जिल्हाध्यक्ष,वाघाळा ब्लाॅक कमिटी अध्यक्ष,शेटोगन कराटे मराठवाडा अध्यक्ष, रोगनिदान, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार,शिवलिगेश्वर मंदिर ते काळेश्वर विष्णुपुरी व गणेशोत्सव काळात गणपती व रांगोळी देखावा स्पर्धा या माध्यमातून ओबीसी चळवळीत केलेले योगदान व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन सदरील नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल माजी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, डॉ.सचिन ऊमरेकर,शितल खंडील माजी नगरसेवक अभिषेक सौदे, उमाकांत पवार,वाघाळा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका, डॉ.प्रा.रमेश नांदेड, सावता परिषद जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे, नारायण अंभोरे,प्रा.ललीता शिंदे,ऊदय देशमुख,
नवनाथ कांबळे,सतिश बसवदे, यांच्या सह मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments