HomeनांदेडNandkumar Gadewar : नंदकुमार गादेवार अ.भा.श्री. वासवी पेनिगुंडा ट्रस्टच्या विश्वस्थ पदावर बिनविरोध

Nandkumar Gadewar : नंदकुमार गादेवार अ.भा.श्री. वासवी पेनिगुंडा ट्रस्टच्या विश्वस्थ पदावर बिनविरोध

नांदेड| महासभेचे राज्य अध्यक्ष तथा उदयोगपती श्री नंदकुमार गादेवार यांची नुकतीच पेनिगुंडा येथील मूळ अ.भा.श्री. वासवी पेनिगुंडा ट्रस्टच्या विश्वस्थ पदावर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

आर्य वैश्य समाजभुषण समाजकार्या विषयी तीव्र तळमळ असलेले, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया आर्य वैश्य महासभाचे संस्थापक अध्यक्ष,श्री काशी अन्नपूर्णा आर्य वैश्य वृद्धाश्रम आणि नित्यान्नसत्रमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष,महाराष्ट्र आर्य वैश्य महासभाचे अध्यक्ष,श्री संत साधु महाराज संस्थानचे उपाध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांची श्री राम नवमीच्या शुभदिनी कोमटी समाजाची आर्य वैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी मातेचे जन्मस्थान असलेल्या पेनुगोंडा येथील अखिल भारतीय वासवी माता ट्रस्टच्या विश्वस्थ म्हणून प्रथम महाराष्ट्र राज्यातून बिनविरोध निवड झाली.

नंदकुमाजी गादेवार हे महाराष्ट्रातील आपल्या समाज बांधवापैकी नियुक्त झालेले पहिले सदस्य होण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे. आपली नियुक्ती समस्त आर्य वैश्य समाज बांधवांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद अशी आहे. आपल्या गरुडभरारी बद्दल सर्वत्र त्यांचे खुप खुप अभिनंदन होत आहे आणि भावी विशेष सेवा कार्यासाठी भरभरुन हार्दिक हार्दिक शुभेच्छा… दिल्या जात आहेत. या पुढे हीं त्यांच्या हस्ते राज्यतील च नव्हे तर भारत देशात समाज संघटन मजबूत करण्यासाठी मोठं योगदान ठरणार आहे.

तिरुपती येथे महासभेचे भक्त निवास लातूर येथे मंगल कार्यालय समाजातील गरजवन्ताचा स्तर उंचावणे आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचार यावर मजबुतीने पालटून लावणे असे मोठे कार्य घडणार आहेत. यासाठी स्वतः गादेवार नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या निवडीचे स्वागत आर्य वैश्य महासभेचे राज्य कार्यकारिणीची सदस्य शिरीष मनाठकर, माजी सदस्य राजेश्वर रायेवार, बांधकाम समितीचे प्रभाकर पत्तेवार, जिल्हा कार्यकारिणी चे डाॅ.सजंय पलीकोंडावार, सुनील व्यवहारे, आर्य वैश्य समाज हदगावचे अध्यक्ष श्रीनिवास दमकोंडवार यांच्यासह आर्य वैश्य समाज बांधव,महीला मंडळ यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments