नांदेड| प्रयागराज येथे कुंभमेळ्यात स्नान करून अयोध्याला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसवर आदळून झालेल्या भिषण अपघातात नांदेडचे ३ तर वसमतच्या एक अश्या चार भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत. हि दुर्घटना रविवारी पहाटे बाराबंकी जिल्ह्यातील पुर्वांचल एक्सप्रेस रस्त्यावर घडली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सध्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शाही स्नानासाठी जात आहेत. नांदेड शहरातून अनेक भाविक कुंभमेळ्या साठी गेले होते. यात शहरातील छत्रपती चौकातील काही भाविक गेल्या अनेक दिवसांपुर्वी प्रयागराजला गेले होते. कुंभमेळा येथे स्नान करून नांदेडच्या भाविकांसह अन्य भाविक अयोध्या येथे राम मंदीराच्या दर्शनासाठी एका टेम्पो ट्रॅव्हल्स बसने निघाले होते.

रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील पुर्वांचल एक्सप्रेस रस्त्यावर एका नादुरुस्त बसवर टेम्पो जाऊन आदळला आहे. या भिषण अपघातात नांदेड येथील सुनिल दिगंबर वरपडे वय ५०, अनुसया दिगंबर वरपडे वय ८०, दिपक गणेश गोदले स्वामी वय ४० सर्व रा. छत्रपती चौक नांदेड आणि जयश्री पुंडलीकराव चव्हाण वय ५० रा. अडगाव रंजेबुवा ता. वसमत जि. हिंगोली या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर टेम्पोमधील अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या छत्रपती चौकात शोककळा पसरली आहे. अपघातातील मयतांचे पार्थीव एवर अॅम्बुलंसने नांदेड येथे आणण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील लोणीकटरा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस रोडवर रोडच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या बसवर महाराष्ट्रातून अयोध्येला जाणारी एक टेम्पो ट्रॅव्हलर बस आदळून झालेल्या अपघातात एकूण चार जण मयत झालेले आहेत. उर्वरित 13 जण जखमी झाले आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

मयतांची नावे खालील प्रमाणे आहेत
1. सुनील दिगांबर वरपडे वय 50 रा. छत्रपती चौक, नांदेड
2. अनुसया दिगांबर वरपडे वय 80 रा. छत्रपती चौक, नांदेड
3. दीपक गणेश गोदले स्वामी वय 40 रा. छत्रपती चौक, नांदेड
4. जयश्री कुंडलिकराव चव्हाण वय 50 रा. आडगाव रंजेबुआ ता. वसमत जि. हिंगोली.
जखमीची नावे खालीलप्रमाणे आहेत
1. चैतन्य राहुल स्वामी वय 16
2. शिवशक्ती गणेश गोदले वय 55
3. भक्ती दीपक गोदले वय 30
4. रंजना रमेश मठपती वय 55
5. गणेश गोदले वय 55
6. अनिता सुनील वरपडे वय 40
7. वीर सुनील वरपडे वय 09
8. सुनिता माधवराव कदम वय 60
9. छाया शंकर कदम वय 60
10. ज्योती प्रदीप गैबडी वय 50
11. आर्या दीपक गोदले वय 05
12. लोकेश गोदले वय 35
13. श्रीदेवी बरगले वय 60
सर्व राहणार छत्रपती चौक नांदेड.