Homeकृषीsugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच...

sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे करंजी शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचा फडाला आज दिनांक १६ रविवारी भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली (Five acres of sugarcane burnt due to short circuit at Karanji Shivara in Himayatnagar taluka). ऊस जळताना शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही. या घटनेत पाच एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडून शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

IMG 20250216 173253 sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

याबाबत सविस्तर व्रत असे कि, हिमायतनगर तालुक्यात सध्या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांच नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहे. असाच एक प्रकार रविवार दिनांक १६ रोजी भर दुपारी दोन वाजता करंजी शिवारात घडला असून, येथील शेतकऱ्याच्या शेतातुन गेलेल्या दोन तारामध्ये झालेल्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणगी पडून आग लागली आहे. घटना लक्षात येताच आजूबाजूसह सर्वच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र उन्हाळ्याचे दिवस आणि हवा असल्याने याचा काहीच फायदा झाला नाही. एकीकडे आज विझविताना दुसरीकडे वाऱ्याने आग भडकत गेली यात ऊस जळून खाक झाला आहे.

IMG 20250216 173306 sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

या दुर्घटनेत करंजी येथील शेतकरी रामराव पांडुरग सूर्यवंशी आणि श्याम कदम यां दोन शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर 58/63/65 मधील अंदाजे पाच एकर ऊस जळुन खाक झाला आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामा करुन महावितरण विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर कारखान्याने ऊस नेण्याला विलंब केल्याने शेतकऱ्याला नुकसानीचा समान करावा लागला असल्याचे या भागातील शेतकरी बोलून दाखवित आहेत. तसेच हिमायतनगर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक वीजतारा ह्या जीर्ण झाल्या असून, याच्या दुरुस्तीकडे महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागून शेतकऱ्यांना याचा नाहक आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments