नांदेड| नोकरीचे आमिष दाखवून आरोग्य (healthcare worker) सेवकासह अन्य दोघांनी किनवट तालुक्यातील एका युवतीवर विदर्भातील जंगलात नेऊन अत्याचार केला असल्याची घटना दिनांक १३ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्रीउशिरा गुन्हा दाखल झाला करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील २३ वर्षीय बेरोजगार युवतीला एका उपकेंद्रातील आरोग्यसेवक विठ्ठल मुंडे, रा.कंधार याने आशा वर्कर म्हणून गावातच नोकरीस लावून देतो. अशी बतावणी करून तू तुझी कागदपत्रे घेऊन किनवट शहरातील पैनगंगातीरी असलेल्या साईबाबा मंदिराजवळ येऊन मला भेट असे सांगितले होते. त्यावर युवतीने विश्वास ठेवत कागदपत्रे घेऊन सोमवारी दुपारी १ वाजता संशयिताने सांगितलेले ठिकाण गाठले. त्यावेळी मुंडे याने एक पेशंट पाहण्यासाठी पैनगंगेच्या दुसऱ्या काठावरील विदर्भातील खरबी गावात जायचे आहे. तूसुद्धा सोबत चल म्हणून पीडितेला त्याच्या दुचाकीवर बसवले.

तसेच खरबी गावालगत पैनगंगा अभयारण्याच्या नाक्यासमोरील जंगलात नेले. त्या ठिकाणी संशयिताने युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर याची चाहूल लागल्याने तिथेच जवळपास असणाऱ्या ३० ते ३५ वर्षीय दोन अज्ञात संशयितांनीही पीडितेवर अत्याचार केला. एव्हढेच नाहीतर तिच्या पर्समधील ३० हजार रुपये. जर कुणाला सांगितली तर मोबाइलमध्ये चित्रित केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुझी बदनामी करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पीडितेने दिली आहे.
