उस्माननगर, माणिक भिसे| जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार कंधार उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी उस्माननगर पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या २८ गावांना भेटी देऊन पोलिस प्रशासनास निगडित असलेल्या ” पोलिस दिदी ” (Police Didi) हा उपक्रम विद्यार्थ्यांना सांगितला . त्यामुळे या उपक्रमाला परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमासाठी पथक नेमण्यात आले आहे. पथकद्वारे विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळावा. तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती पबजी खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या ऑनलाईन तक्रार कशी करावी, यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती सपोनि चंद्रकांत पवार (Police Chandrakant Pawar) यांनी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना पोलीस दीदी यांनी परस्पर संवादी जागरूकता कार्यक्रमात वाहतूक आणि रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अल्पवयीन मुलीवर होणारे लेंगिक गुन्हे, रॅगिंग, ड्रग्ज, इतर विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांच्या नियमित संपर्कात राहावे, शाळा भेट रजिस्टर ठेवावे व त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये घ्याव्यात त्याचबरोबर शाळेच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व इतर महत्त्वाच्या कामात सहभागी होऊन त्यांना पोलिसांची कामे व कर्तव्याबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सूचित करावे, विविध वयोगटातील विद्यार्थांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी जागरूकता निर्माण करावी लागणार आहे. पोलीस दीदीवर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देखरेख करणार आहेत.कुठल्याही क्षणी दूरध्वनीवरून संपर्क केल्यास पोलीस ताबडतोब मदतीला धावून येतील. त्यामुळे निर्भयपणे परिसरात घडणाऱ्या गुन्ह्याच्या घटनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन सपोनि चंद्रकांत पवार यांनी केले.

पोलीस विभागांतर्गत हद्दीतील कॉलेज व शाळांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या उपक्रमातंर्गत विद्यार्थी केंद्रबिंदू असणार आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात येईल. शिक्षकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्यांवर पोलीस लक्ष ठेवणार आहे. शाळांमध्ये रजिस्टरमध्ये असलेल्या नोंदीची दखल घेण्यात येणार . यात कर्तव्यात कसूर होता कामा नये, याची दखल घेण्यात येणार आहे द्यावी लागणार आहे, विशेष.अनुचित घटनेबद्दल तत्काळ माहितीशालेय परिसरात किंवा इतरत्र अनुचित प्रकार घडत असेल किंवा विद्यार्थिनींची कोणी छेड काढत असेल तर निर्भयपणे या घटनेबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे यावेळी बोलताना म्हणाले.

प्रत्येक शाळेत भेट देऊन जागरूकता निर्माण करण्याचं काम या ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी पोलीस कर्मचारी जमादार सुशील कुबडे, श्रीमंगले, हंबर्डे, माधव पवार, आप्पाराव वरपडे, पूजा भटकुळे, आदींनी मार्गदर्शन केले या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असताना दिसून येत आहे.