Police Didi : उस्माननगर परिसरात “पोलीस दीदी ” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्माननगर, माणिक भिसे| जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार कंधार उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी उस्माननगर पो.स्टे. अंतर्गत येणाऱ्या २८ गावांना भेटी देऊन पोलिस प्रशासनास निगडित असलेल्या " पोलिस दिदी " (Police Didi) हा उपक्रम विद्यार्थ्यांना सांगितला . त्यामुळे या उपक्रमाला परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमासाठी पथक नेमण्यात आले आहे. पथकद्वारे विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळावा. तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती पबजी खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या ऑनलाईन तक्रार कशी करावी, यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती सपोनि चंद्रकांत पवार (Police Chandra...
