श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील नागरिक सध्या व्हिआय मोबाईल नेटवर्कच्या अनेक अडचणीने व कंपनीच्या गलथान कारभारने वैतागले आहेत.यामुळे सेवेत अडथळा येत असल्याने नागरिकांनी आता करावे तरी काय ? असा प्रश्न पडला आहे.

मागील काही दिवसापासून मोबाईलच्या दोघांमधील संभाषणामध्ये वारंवार व्यत्यय येत होता,अशातच मकर संक्रांतीच्या सनाच्या दिवशीच दिवसभर व्हिआय कंपणीचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहक पार वैतागुन गेले होते.तर दुसर्या दिवशी वृत्त लिहे पर्यंत नेटवर्क आलेच नव्हते.

माहूर – किनवट तालुक्यातील सर्वांत मोठी बाजार पेठ म्हणून प्रसिध्द असलेल्या वाई बाजार येथील व परिसरातील ग्राहकांनी व्हिआय कंपन्यांचे महागडे प्लॅनसाठी पैसे मोजूनही वाई बाजारला निगडीत असलेल्या ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.वाई बाजारसह परिसरातील अनेक भागात व्हिओ कंपणीने टॉवर उभारलेले आहेत.

त्यामुळे या भागातील मोबाईल धारकांनी मोठ्याप्रमाणावर या कंपन्याचे प्लॅन घेतलेले आहेत.परंतु मागील अनेक दिवसापासून मोबाईलच्या माध्यमातून दोघांमधील संभाषणामध्ये वारंवार व्यत्यय येणे,डाटा बंद होणे यासह नेटवर्क असतांना हॅलो हॅलो करुन ग्राहक पार वैतागले आहेत.व्हिआय कंपणीने अगोदर वेगवेगळ्या ऑफर देवून ग्राहकांना आकर्षित केले.

नंतर ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर महागडे रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या माथी मारल्या गेले आहे.आता सनासुदीच्या दिवसातच नेटवर्क नसल्याने संपर्कात व्यत्यय येत आहे . शुभेच्छाची देवान घेवान करणार्या मकर संक्रांतीच्या दिवशीच व्हिआय कंपणीवर संक्रांत आल्याने सनाच्या दिवशीच दिवसभर नेटवर्क नसल्याने अनेकांना शुभेच्छा देता आल्या नसल्याने ग्राहकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे व्हिआय कंपणीने तात्काळ सेवा सुधारावी अन्यथा ग्राहक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात दिसून येत आहेत.