Network Down ; व्हिआय कंपणीच्या नेटवर्कवर संक्रांत ; संक्रांतीच्या दिवशीच नेटवर्क गायब
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील नागरिक सध्या व्हिआय मोबाईल नेटवर्कच्या अनेक अडचणीने व कंपनीच्या गलथान कारभारने वैतागले आहेत.यामुळे सेवेत अडथळा येत असल्याने नागरिकांनी आता करावे तरी काय ? असा प्रश्न पडला आहे.
मागील काही दिवसापासून मोबाईलच्या दोघांमधील संभाषणामध्ये वारंवार व्यत्यय येत होता,अशातच मकर संक्रांतीच्या सनाच्या दिवशीच दिवसभर व्हिआय कंपणीचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहक पार वैतागुन गेले होते.तर दुसर्या दिवशी वृत्त लिहे पर्यंत नेटवर्क आलेच नव्हते.
माहूर - किनवट तालुक्यातील सर्वांत मोठी बाजार पेठ म्हणून प्रसिध्द असलेल्या वाई बाजार येथील व परिसरातील ग्राहकांनी व्हिआय कंपन्यांचे महागडे प्लॅनसाठी पैसे मोजूनही वाई बाजारला निगडीत असलेल्या ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.वाई बाजारसह परिसरातील अनेक भागात व्हिओ ...
