Homeकरियरअंगणवाडी केंद्रे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावीत : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

अंगणवाडी केंद्रे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावीत : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

शाळांशी अंगणवाड्यांना जोडून बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन

नांदेड| अंगणवाडी केंद्रे केवळ पोषण आहार वाटपापुरती मर्यादित न राहता बालकांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावीत. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

नांदेड शहरातील अंगणवाडी केंद्रांच्या संदर्भात जिल्हा बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी प्रवीण मांदळे आणि जिल्हा समुपदेशक तथा शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कच्छवे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रांना प्राथमिक शाळांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बालकांचा बौद्धिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी शाळा आणि अंगणवाडी यांच्यात समन्वय वाढविणे आवश्यक आहे.

अंगणवाड्यांच्या सुविधा सुधारण्यावर भर – बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी अंगणवाडी केंद्रांच्या अडचणी दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी प्रवीण मांदळे यांनी अंगणवाडी केंद्रे प्राथमिक शाळांशी जोडल्यामुळे जागा, सुविधा आणि शैक्षणिक बाबींशी संबंधित प्रश्न सोडविण्यास मदत होईल, तसेच बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे अधिक सुलभ होईल, असे स्पष्ट केले.

पहिली आठ वर्षे विकासासाठी महत्त्वाची – शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कच्छवे यांनी बालकांच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. अंगणवाडीतील बालकांमध्ये मोठी क्षमता असून, ती ओळखून योग्य वेळी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीच्या प्रारंभी कैलास तिडके यांनी प्रास्ताविक केले. नांदेड शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments