HomeनांदेडSardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

नांदेड| देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा ता.धर्माबाद जि.नांदेड येथिल पुर्णाकृती पुतळ्याकडे सत्ताधाऱ्यांकडून मोठे दूर्लक्ष होत आहे. पुतळ्याची दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह आज येथे आले होते.

प्रारंभी सरदार पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, पुतळा दुरावस्थेबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांकडून घेण्यात आली.त्यावर आक्रमकपणे भूमिका मांडून या पुतळ्याची दुरावस्था नव्हे तर,विटंबना असून येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून याबाबत दखल घ्यावी.

अन्यथा येत्या दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनापासून याच ठिकाणी लाक्षणिक उपोषण, रास्तारोको त्याचबरोबर,नव्याने पुतळा उभारण्यासाठी भिकमांगो आदोलन करण्यात येणार असल्याचा एल्गार तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आक्रमकपणे केला. यावेळी पक्षाचे नायगांव तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, नायगांव शहराध्यक्ष संजय पाटील चव्हाण,नरसी शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, बाळू गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments