HomeनांदेडHonesty of conscientious auto drivers : कर्तव्यदक्ष ऑटो चालकांचा प्रामाणिकपणा ऑटोमध्ये विसरून...

Honesty of conscientious auto drivers : कर्तव्यदक्ष ऑटो चालकांचा प्रामाणिकपणा ऑटोमध्ये विसरून राहीलेले बॅग व मोबाईल केला परत

नांदेड| प्रमाणिकपणा हा आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरी, अजुनही समाजामध्ये काही माणसं अशा चारित्र्याची आहेत जी इतरांसाठी आदर्श ठरतात. असाच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव नांदेडमध्ये दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी रविवार सकाळी 11:30 वाजता घडला.

टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना चे सदस्य रिक्षाचालक विलास आनेराव ( रा. पांडुरंग नगर नांदेड) हे ऑटो रिक्षा चालक आपल्या दररोजच्या प्रमाणे प्रवासी घेऊन जात होते. त्यांच्याच रिक्षामध्ये प्रवासी ताराबाई कुऱ्हाडे व त्यांचे पती हे दोघे दापत्य हिंगोली गेट ते मस्तानपुरा प्रवास करत होते. मस्तानपुरा येथे उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले आपली बॅग व मोबाईल रिक्षामध्येच विसरून गेली आहे.

या घाबरणाऱ्या परिस्थितीत त्वरित त्यांचे नातेवाईक गजानन कट्टे चौफाळा यांना फोन केला त्यांनी लगेच फोनवर संपर्क केला विलास अनेराव यांनी फोन उचलला हो आपला मोबाईल व बॅग माझ्या रिक्षात आहे लगेच रिक्षा चालक यांनी या बॅटची माहिती अध्यक्ष अहेमद (बाबा) यांना दिली. अध्यक्ष यांनी प्रवासी यांना घेऊन इतवारा पोलीस स्टेशन येथे येण्यास सांगितले.

आणि सादर बॅग ताराबाई कुराडे यांच्या नातेवाईकाकडे सुखरूप परत करण्यात आली. यावेळी वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. इंगोले साहेब, जमादार हमदे साहेब,देवकते साहेब ,मुंडे साहेब, टायगर संघटनाचे प्रदेशाध्यक्ष अहेमद बाबा, महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख तयंब , जिल्हाध्यक्ष शेख अहेमद , शहर अध्यक्ष मुखिद पठाण,शहर उपाध्यक्ष पिंटू गजभारे, आदी उपस्थित होते. गजानन कट्टे यांनी कर्तव्यदक्ष चालकाला 200 रूपये बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या व रिक्षा चालकांच्या प्रमाणिकपणाचे मनापासून आभार मानले हा प्रसंग नांदेडकरांसाठी प्रेरणा ठरतो. ज्यामध्ये माणुसकी प्रमाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments