Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Guardian Minister : पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश

Guardian Minister : पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. यामुळे चार गावे जलमय झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात २०० मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. महसूल व एसडीआरएफच्या टीमचे सकाळपासून शोध व बचाव कार्य सुरु आहे. तसेच नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पातून १ लाख २५ हजार क्यूसेस विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे शहरात व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सर्व परिस्थिती त्यांनी जाणून ...
MLA Baburao Kadam Kohlikar : पैनगंगा नदीकाठच्या पुरस्थितीची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली पाहणी

MLA Baburao Kadam Kohlikar : पैनगंगा नदीकाठच्या पुरस्थितीची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली पाहणी

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांत आणि शेतीत पाणी शिरून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विविध गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आणि प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. इसापूर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग आणि दोन दिवस झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कामारी, जवळगाव, घारापुर, खडकी, टेम्भूर्णी, विरसनी, दिघी, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, धानोरा, बोरगडी, कोठा, एकंबा, वारंगटाकळी, मंगरूळ, कार्ला, सिबदरा, खैरगाव, वडगाव, सवना, सरसम, आदी गावांसह नदी-नाल्यांच्या काठावरील अनेक शेतीत आणि घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल...
Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Former MLA Madhavrao Patil Javalgaonkar) यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. अतिवृष्टीच्या पाण्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग यांसारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही घरांची पडझड झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू भिजून खराब होऊन गेल्या आहेत. दरम्यान, इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, गावोगावी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची माहिती ...
MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली हिमायतनगरच्या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी

MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली हिमायतनगरच्या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रविवारी भेट दिली आणि प्रश्नाला पुन्हा नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास होणार नाही यासाठी जातीने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. हिमायतनगर शहर परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर शहराला महापुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे नाल्याच्या काठावरील व सखल भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक 1, 13 व 16 मधील नागरिकांचे मोठं नुकसान झाला आहे. त्यामुळे अनकेन रात्र जागून काढावी लागली असून, किनवट दौऱ्यावर जात असताना हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडल्या. त्यानंतर तातडीने मदत व उप...
Sardar Vallabhbhai Patel ; सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कारेगाव फाटा दुर्दशा प्रकरण

Sardar Vallabhbhai Patel ; सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कारेगाव फाटा दुर्दशा प्रकरण

नांदेड, राजकीय
नांदेड l सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा येथिल पुर्णाकृती पुतळ्याची सत्ताधाऱ्यांकडून दुर्दशा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलनात्मक भूमिका घेतल्यानंतर नांदेडचे खा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी या प्रकरणात स्वतःच दखल घेऊन उपविभागीय अधिकारी यांना तातडीने योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा आहे.ग्रामीण भागात त्यांच्या एकमेव असलेल्या या पुर्णाकृती पुतळा दुर्दशेबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकांऱ्यासह त्याठिकाणी दि.९ ऑगस्ट रोजी गेले होते तसेच,सरदार वल्लभभाई पटेल ...
Shravanmas ; श्रावणमास निमित्ताने नरोबा देवस्थान कौठा येथे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते महाअभिषेक

Shravanmas ; श्रावणमास निमित्ताने नरोबा देवस्थान कौठा येथे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते महाअभिषेक

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नरोबा देवस्थान कौठा येथे श्रावण महिन्याचा शेवटच्चा शनिवार निमित्ताने माजी आमदार अमरभाऊ राजुरकर भाजपा नांदेड महानगर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. श्रावण मास निमित्ताने महिनाभर दैनंदिन महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. नरोबा देवस्थान मंदिर कौठा नांदेड येथे श्रावणमास महिन्यांत शेवटच्या शनिवार निमित्ताने 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरू व्यंकटेश मुळी यांच्या विधीवत आचार्य तत्वाने मंत्रोच्चार करण्यात आले, यावेळी शैकडो भाविक भक्तांचा उपस्थित महाअभिषेक संपन्न झाला.यावेळी विश्वस्त समिती अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, कार्याध्यक्ष विनोद काकडे,नगरसेवक राजू पाटील काळे,राजु गोरे,संजय मोरे,अभिषेक सौदे,शितल खांडील,अप...
grand Dahi Handi : शिवसेनेच्यावतीने भव्य दहीहंडीचे आयोजन ; 55555 रूपयांचे आकर्षक बक्षीस

grand Dahi Handi : शिवसेनेच्यावतीने भव्य दहीहंडीचे आयोजन ; 55555 रूपयांचे आकर्षक बक्षीस

नांदेड, राजकीय
नांदेड| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दि.18 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी, कै.रामेश्वरभाऊ तिवारी व्यासपीठ मारवाडी धर्मशाळेसमोर हनुमानपेठ वजिराबाद नांदेड येथे सायंकाळी 4 वाजता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीमध्ये विजेत्या स्पर्धकास 55 हजार पाचशे 55 रूपये बक्षीस देण्यात येणार असून इच्छूक दहीहंडी टिमचे यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन संयोजक शिवसेना महानगरप्रमुख मनोज यादव यांनी केले आहे. या दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख (नांदेड-हिंगोली) बबनराव थोरात यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर तर विशेष पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.रविंद्रभाऊ चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी किरण अंबेकर, पोलीस उपअधिक्षक सुरजकु...
Guardian Minister Atul Save : तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक सेवा : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, राजकीय
नांदेड| नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्याने देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदने “जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” सेवा विकसित केली आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. नांदेड जिल्हा परिषदेने या व्हाट्सअॅप तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांना पारदर्शक सेवा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. “जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल” या एकात्मिक माहिती पोर्टलचा शुभारंभ पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, ज...
Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

नांदेड, राजकीय, लेख
भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या प्रवाहात काही व्यक्तिमत्व अशी असतात की,जी आपल्या लोकाभिमुख कार्यकर्तृत्वाने,दूरदृष्टीने आणि जनसेवेच्या अपार तळमळीने इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण करतात.मा.सूर्यकांताताई पाटील मॅडम हे असेच एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अखंड ऊर्जेच स्त्रोत निर्माण करणारे निर्मोही व्यक्तिमत्व आहे. एका शेतकरी कुटुंबात पण अन्यायाचा सतत प्रतिकार करणाऱ्या,समाजसेवेचा वारसा घेऊन चालणाऱ्या आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या माजी आमदार मातोश्री मा.अंजनाबाई या शूरवीर आई-वडिलांच्या पोटी मा.सूर्यकांताताई साहेबांचा जन्म 15 ऑगस्ट 1948 रोजी, विकासापासून कोसो दूर असलेल्या मराठवाड्यातील, नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील एका छोट्याशा वायपणा या गावी ...
Vinod Kanchangire ; भाजपा ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे

Vinod Kanchangire ; भाजपा ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नांदेड शहर भाजपा ओबीसी महानगर अध्यक्षपदी ओबीसी चळवळीत सक्रिय योगदान व विविध कार्यात सहभागी होणारे विनोद कांचनगिरे यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे,या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण ,खासदार अजित गोपछेडे,भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, माजी महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या शिफारशीनुसार नांदेड शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष अमर राजूरकर यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे ओबीसी जिल्हा महानगर अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे यांच्यी नियुक्ती करण्यात आली. विनोद कांचनगिरे यांनी मागील कार्यकाळात शिवलिंगेश्वर मंदिर विश्वस्त समिती अध्यक्ष, दुर्गा माता मंदिर,फ्लोअर मिल असोसिएशन अध्यक्ष,ऊधोग आघाडी जिल्हाध्यक्ष,वाघाळा ब्लाॅक कमिटी अध्यक्ष,शेटोगन कराटे मराठवाडा अध्यक्ष, रोगनिदान, रक्तदान शिबिर, गुणवंत विद...
error: Content is protected !!