Wednesday, May 20

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shrijaya Chavan  : आ. श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर

Shrijaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर

नांदेड, राजकीय
नांदेड| भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून आमदार श्रीजया चव्हाण यांची ही नियुक्ती झाली आहे. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत....
Nanded ✈️ नांदेड विमानतळ MIDC च्या गलथान कारभारामुळे बंद

Nanded ✈️ नांदेड विमानतळ MIDC च्या गलथान कारभारामुळे बंद

नांदेड, राजकीय
नांदेड | शहराच्या मध्यभागी असलेले बहुचर्चित नांदेड विमानतळ एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बंद पडले असून, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत थेट जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला आहे. मारावार म्हणाले की, अनेक वर्षे नांदेड विमानतळ रिलायन्स समूहाच्या ताब्यात होते. परंतु, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हट्टापायी विमानतळाचा कारभार रिलायन्सकडून काढून घेऊन अनुभव नसलेल्या एमआयडीसीकडे दिला. 🔹 एमआयडीसीचा शून्य अनुभव मारावार यांनी आरोप केला की, एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे अनेक मोठे उद्योगधंदे आधीच बंद पडले आहेत. अधिकारी भूखंडांच्या दलालीत मश्गूल असताना, विमानतळ चालवण्याचा अनुभव नसताना त्यांच्याकडे ताबा दिल्यामुळे विमानतळ "खड्ड्यात" गेला. 🔹 धावपट्टीवर भेगा – प्रवासी हैराण नांदेड विमानतळावरून दररोज जवळपास ५०० प्रवासी जगप्रस...
MLA Chikhlikar : तात्काळ पंचनामे करा, नुकसानीचे प्रस्ताव सादर करा; निधीची कमतरता पडणार नाही -आमदार चिखलीकर

MLA Chikhlikar : तात्काळ पंचनामे करा, नुकसानीचे प्रस्ताव सादर करा; निधीची कमतरता पडणार नाही -आमदार चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा| तालुक्यातील मागील दोन तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावस झाला नदी नाल्याना पूर आला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जनावरे दगावली पुरामुळे वाहतुक ठप्प झाली शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील पूर परिस्थिती चा आढावा घेतला. तात्काळ पंचनामे करा प्रस्ताव पाठवा, निधीची कमरता भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक करत तालुका प्रशासनाला सूचना दिल्या. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील अतिवृष्टी व उदभवलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा आढावा लोहा तहसील कार्यालयात गुरुवारी (२१ ऑगस्ट) दुपारी एक वाजता घेतला. बैठकीस माणिकराव मुकदम माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पवार...
Final ward composition : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

Final ward composition : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

नांदेड, राजकीय
नांदेड| ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी पासुन परिशिष्ट 8 (अ) व 8 (ब) मध्ये पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्धीचे ठिकाण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बोटीस बोर्डावर, जिल्हा परिषद नांदेडच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर, संबंधित तहसिल कार्यालयाच्या बोर्डावर, संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in वर सदर जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सोमवारी किनवट येथे...
heavy rains ; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजाराची मदत करा

heavy rains ; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजाराची मदत करा

नांदेड, राजकीय
नांदेड l गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायगांव तहसीलदारांमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज करण्यात आली. गत काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सूरू असल्याने त्यासह विविध जनसमस्याबाबत नायगांवच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,सरसकट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत तात्काळ जाहीर करा,नदी-नाल्यालगत शेत जमीन खरडून गेली त्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच,औराळा गावातील स्मशान भूमीचा रस्ता तात...
Flood victims, don’t panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Flood victims, don’t panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीकाठची शेती पूर्णपणे जलमय झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, हळद यांसारखी पिके पाण्याखाली जाऊन शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटात प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली. ते हिमायतनगर तालुक्यातील कोठा, कोठा तांडा, एकंबा आदी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू ठेवून आपली हकिगत मांडली. “गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस आणि पुरामुळे सगळं काही वाहून गेलं. आता उरलं त्यावर कसं जगायचं?” असा आर्त प्रश्न शेतकऱ्यांनी केला. ...
Himayatnagar : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

Himayatnagar : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीनाल्याच्या काठासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकाटात सापडला असून, यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी (Provide assistance of Rs 50,000 per hectare to farmers in Himayatnagar taluka who suffered losses due to heavy rains) अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारां मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे नदी नाल्याच्या काठावरील शेती खरडून पिके वाहून गेली आहेत. इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या निसर्गामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये व नाले व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना ह...
Hadgaon : हदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे आजी माजी आमदार खासदार एका मंचावर दिसणार

Hadgaon : हदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे आजी माजी आमदार खासदार एका मंचावर दिसणार

नांदेड, राजकीय
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या शांतता बैठक व पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने हदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे आमदार... खासदार एका मंचावर दिसणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिंगोली लोकसभेचे शिवसेना (उबाठा) चे खा. नागेश पाटील आष्टीकर तर शिवसेना( शिदे गट) चे हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेनेचे माजी खा. सुभाष वानखेडे व काँग्रेसचे माजी आ. माधवराव पाटील जळगावकर अन्य नेते राजकीय विरोधक असले तरी या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर एका मंचावर दिसणार आहेत. सत्ताधारी व विरोधक हे बडे नेते एकत्र दिसणार असल्याने नागरिकात मात्र उत्सुकता दिसून येत आहे. आणखी विशेष म्हणजे हदगाव शहरात दि 21 ऑगष्ट2025 गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत प्रथमच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर...
Nagesh patil ; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – खासदार नागेश पाटिल आष्टिकर

Nagesh patil ; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – खासदार नागेश पाटिल आष्टिकर

नांदेड, राजकीय, हिंगोली
नांदेड/हिंगोली, अनिल मादसवार | हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश बापूराव पाटिल आष्टिकर यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट तसेच माहूर तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मुसळधार पावसामुळे पैनगंगा व कयाधू नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पाण्याचा प्रवाह ओसरलेला नसल्याने कृषी विभागाला प्रत्यक्ष पाहणी करता आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय हदगाव, किनवट, हिमायतनगर या शहरी भागांसह ग्रामीण भागात देखील अनेकांच्या घरामध्ये पूरपाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदारांनी केली. “ही एक नैसर्गिक आपत्त...
Mla. Antapurkar : मदतकार्य, पंचनामा वेगात करण्याच्या सूचना : आ. अंतापूरकर

Mla. Antapurkar : मदतकार्य, पंचनामा वेगात करण्याच्या सूचना : आ. अंतापूरकर

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक नदीकाठच्या गावांना सततच्या मुसळधार पावसामुळे पूर आला असून, शेतजमिनी मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून करडखेड, मरखेल, हाणेगाव, आरळी यासह अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार जितेश अंतापूरकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घ्यावे, असे निर्देश दिले. तसेच स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लक्षात घेता तात्काळ पंचनामे करावेत, तसेच मतदारसंघातील पूरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केले. शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत,...
error: Content is protected !!