Wednesday, May 20

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Smart meters : देगलूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू नयेत – शिवसेनेची मागणी

Smart meters : देगलूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू नयेत – शिवसेनेची मागणी

नांदेड, राजकीय
देगलूर| देगलूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीज बिलाच्या तक्रारी वाढल्या असून, दुरुस्तीच्या नावाखाली महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. शहरातील नागरिकांनी चार महिन्यांपूर्वी महावितरणकडे "मीटर जपिंग" व हजारो रुपयांचे बिल येत असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावर तोडगा न काढता, आता दुरुस्तीच्या नावाखाली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री. चाटे यांना निवेदन देऊन "देगलूर शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. जर महावितरणने हट्ट धरला तर शिवसेनेतर्फे आमरण उपोषण, रास्ता रोको आणि मीटर फोडो आंदोलन उभारले जाईल," असा इशारा दिला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पा...
Deglur ; देगलूर तालुक्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची शिवसेना उबाटा ची मागणी

Deglur ; देगलूर तालुक्यातील शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची शिवसेना उबाटा ची मागणी

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले| अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना एकरी २५.हजार रुपये अनुदान पिक विमा कर्ज माफी घरपडी त्वरीत देण्यात यावे अन्यथा शिवसेना उध्व बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी नवीन बस स्थानक नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रासता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारयासह प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिक माहिती असे की देगलूर तालुक्यात आगस्ट महिन्यात तबल दोन वेळा सतत अतिवृष्टीमुळे शेतकरी बाधवानी निसर्गाच्या भरवशावर उसनवारी करून महागामोलाचे बियाणे खते कीटकनाशके खरेदी करून खरीप पिकाची लागवड केली होती. पण कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकर्यांच्या नशिबी सटविने पाचविला पुजलेल्या अलिखित लिहुन ठेवलेल्या नशिबी नुसार निसर्गाच्या नेहमीच्याच दुष्ट चक्रामुळे हातातोंडाशी आलेले पिके नष्ट झाल्यात जमा झालेली आहेत गेल्या पाच वर्षा पासून ओ...
Former MLA Shankar Anna Dhondge : शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Former MLA Shankar Anna Dhondge : शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा मतदारसंघामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. लोकप्रतिनिधी व आघाडी सरकार निष्क्रिय असून अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला. महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ३ सप्टेंबर रोज बुधवारी सकाळी ठीक ११ वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याची सुरुवात भुईकोट किल्ला कोटबाजार - मोठी दर्गा - गांधी चौक - कापड लाईन- शिवाजी चौक- आंबेडकर पुतळा यामार्गाने वाजत गाजत, नारे देत उपविभागीय कार्य...
Formal mla madhavrao patil jawalgaonkar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर

Formal mla madhavrao patil jawalgaonkar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, राजकीय
नांदेड / हिमायतनगर अनिल मादसवार| गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस आणि नद्यांच्या पुरामुळे हदगाव–हिमायतनगर तालुका जलमय झाला आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पैनगंगा, कयाधू, कामारी-लाखाडी नद्या तसेच सर्व नाले तुडुंब भरून शेतात व घरांमध्ये पाणी शिरले. शेतकरी बांधवांचे गुरे-ढोरे, शेतीसाठी लागणारे साहित्य, सिंचन साधने पुरात वाहून गेले. शेतातील सर्व पिके नष्ट झाली असून, रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. शहरातील दुकाने पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
Give special package : नांदेड जिल्ह्याला ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी साठी विशेष पॅकेज द्या – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

Give special package : नांदेड जिल्ह्याला ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी साठी विशेष पॅकेज द्या – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा| ढगफुटीच्या सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाली. लोहा कंधार सह अन्य तालुक्यात पुरामुळे शेतीचे, मानवी वस्तीचे, छोटे मोठे दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे नियम।बाजूला ठेवून नांदेड जिल्ह्यासाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे. तसेच नदीकाठच्या शेतीसाठी विशेष बाब म्हणून, शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. लोहा कंधार तालुक्यात २८ व २९ ऑगस्ट रोजी मागील चार फिवसा ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली त्यामुळे पूरपरिस्थिती उदभवली शेती, दुकाने,अनेक गावातब घराचे मोठे नुकसान झाले. जीवनोपयोगी साहित्य पाण्यात गेले, जनावरे वाहून गेली.अनेक ठिकाणी रेसक्यु करून नागरिकांचें जीव वाचविण्यात आले.आमदार प्रतापराव प...
Wamanrao patil wadgaonkar : वामनराव पाटील वडगावकर यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गटात) जाहिर प्रवेश

Wamanrao patil wadgaonkar : वामनराव पाटील वडगावकर यांचा राष्ट्रवादी (अजित पवार गटात) जाहिर प्रवेश

नांदेड, राजकीय
नांदेड/हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस व आमदार बाबुराव कदम यांचे विश्वासू कट्टर समर्थक वामनराव पाटील वडगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकत व आमदार कोहळीकर यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गटात) जाहिर प्रवेश केला आहे. हा प्रवेश आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव, तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वामनराव पाटील वडगावकर यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. याचसोबत अभिलाष जयस्वाल, उबाठा गटाचे अमोल धुमाळे, प्रहारचे कार्यकर्ते संतोष टोकलवार, गणेशराव पाटील विरसनीकर, दत्तरामजी माने चाथारीकर, शरदचंद्र पवार गटाचे आकाश सूर्यवंशी आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्...
Ashokrao Chavan : अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले – खा. अशोकराव चव्हाण

Ashokrao Chavan : अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले – खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड| यंदाच्या खरिप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा जबर फटका बसला. जिल्ह्यातील ९३ पैकी ८८ मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांची परिस्थिती होत्याचे नव्हते झाल्यासारखी आहे. रस्ते, पूल, घरे, पशुधनासह शेतीचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. शनिवारी व रविवारी दोन दिवस त्यांनी नांदेड शहर व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना नांदेड जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती अतिशय भीषण असल्याचे ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील ५३ महसुली मंडळांमध्ये किमान ३ किंवा त्याहून अधिक वेळा अतिवृष्टी झाली. सोयाबीन व कपाशी या दोन प्रमुख पिकांसह...
Ganpati appearance competition : गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात गणपती देखावा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा – अमरनाथ राजुरकर

Ganpati appearance competition : गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात गणपती देखावा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा – अमरनाथ राजुरकर

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर जिल्ह्यातर्फे गणेश उत्सवानिमित्त भव्य देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात नांदेड मध्ये भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने भव्य गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेसाठी प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण, स्वदेशी सारखे सामाजिक विषय हाताळून मंडळातील पदाधिकाऱ्यांनी देखावे सादर करावे, प्रत्येक गणेश मंडळाने सहभागी होण्यासाठी नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. गणपती मंडळास भेट देऊन देखावा ...
Shankar anna dhondage : उपविभागीय कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार – मा.आ. शंकरअण्णा धोंडगे

Shankar anna dhondage : उपविभागीय कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार – मा.आ. शंकरअण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये २८ व २९ ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाची लोकप्रतिनिधी केवळ पाहणीचे सोंग करण्याचे नाटक करीत आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी नकारात्मक धोरणाचा निषेध करण्यासाठी व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ सरकारकडून मदत देण्यात यावी यासाठी कंधार उपविभागीय कार्यालयावर ३ सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महिती दिली. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार, माझी उपसभापती शफीउल्ला बेग, युवा नेते शिवराज धोंडगे, सुभाष मोरे, अशोक सो...
Mla Baburao Kadam Demands : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे १००% नुकसान

Mla Baburao Kadam Demands : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे १००% नुकसान

कृषी, नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई/नांदेड, अनिल मादसवार | नांदेड जिल्ह्यातील हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करून तातडीने सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इसापूर धरणाचे तब्बल १३ दरवाजे उघडल्यामुळे, तसेच हदगाव तालुक्यात १५८ मि.मी. व हिमायतनगर तालुक्यात तब्बल २३२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आणि ओढे-नाल्यालगतच्या शेतजमिनींमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. विशेषतः ऊस, सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापड...
error: Content is protected !!