Wednesday, May 20

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Join Bjp : मुदखेडच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Join Bjp : मुदखेडच्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नांदेड, राजकीय
नांदेड| मुदखेड शहराच्या अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आज माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शनिवारी दुपारी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला किशोर स्वामी, मुदखेडचे भाजप तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, माजी नगराध्यक्ष खुर्शिद शेठ, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम, तालुका महामंत्री मारोती जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये मोहम्मद खासीम, मोहम्मद खालेद, अब्दुल सत्तार, मोहम्मद हुसेन, मोहम्मद इम्रान, कुरेशी समाज संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद गौस, शेख समीर, उपाध्यक्ष मोहम्मद खासिम मोहम्मद हुसेन, मोहम्मद रियाज, मोहम्मद आवेश, मोहम्मद अरबाज, मोहम्मद अली आदींचा समावेश आहे....
Nanded bjp Protest : आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात नांदेड भाजपकडून तीव्र आंदोलन

Nanded bjp Protest : आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात नांदेड भाजपकडून तीव्र आंदोलन

नांदेड, राजकीय
नांदेड| काँग्रेसने तयार केलेला हा व्हिडिओ हा राजकारणातील अध:पतनाचे उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींवर आक्षेप घेऊन काँग्रेसने मातृशक्तीचा अपमान केला असल्याचे म्हणत भाजपा महानगराध्यक्ष ,माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेस नेत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. बिहारच्या दरभंगा येथे झालेल्या काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करण्यात आली होती. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या व्यासपीठावरून मोदींच्या आईचा अपमान करण्यात आला तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला याचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देशभर काँग्रेस विरोधात निषेध नोंदवण्यात येत आहे. शनिवारी भाजपा महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा महानगराध्यक्षा सौ. ज्योती किशन कल्याणकर यांच्या वतीने शहरात...
MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर आरोग्य सेवेसाठी एक्शन मोडवर

MLA Chikhlikar : आमदार चिखलीकर आरोग्य सेवेसाठी एक्शन मोडवर

आरोग्य, नांदेड, राजकीय
लोहा| माझे कोणी ऐकत नाही मी काय करू, डॉक्टर वेळेवर येत अशी हतबलता आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,जिल्हा शल्यचिकित्सक याच्यासमोर रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ बारी यांनी व्यक्त केली. लाखो रुपयांची साधनसामुग्री असूनही ती धूळखात पडून आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत पण ते ड्युटी सोईनुसार करतात. रुग्णाची होणारी प्रचंड हेळसांड सुरू आहे. यापूर्वी सूचना देऊनही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संबंधिताना झापले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पेरके यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व सर्व विभागाची चौकशी करण्याचा निर्णय बैठकीत घेतला. उपजिल्हा रुग्णालय असूनही प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी अवस्था झालेल्या या रुग्णालयातील डॉक्टर महिन्यात फक्त चार -पाच वेळा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर येतात आणि मेडिकल सुप्रीडेंट सुद्धा सोयीनुसार येत असतील तर हॉस्पिटल यंत्रणेला दुर्धर आजार झाल्याचे सम...
Swearing-in ceremony : सी. पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी

Swearing-in ceremony : सी. पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी

राजकीय, मुंबई
नवी दिल्ली| राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. उपराष्ट्रपतींनी...
Shiv Sena Metropolitan Chief Prakash Marawar : नांदेड महापालिकेसमोर 12 सप्टेंबर ऐवजी 15 सप्टेंबर रोजी शिवसेना( ठाकरे) पक्षाचे बोंब मारो आंदोलन

Shiv Sena Metropolitan Chief Prakash Marawar : नांदेड महापालिकेसमोर 12 सप्टेंबर ऐवजी 15 सप्टेंबर रोजी शिवसेना( ठाकरे) पक्षाचे बोंब मारो आंदोलन

नांदेड, राजकीय
नांदेड| महापालिकेच्या गलतन कारभाराच्या निषेधार्थ नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 15 सप्टेंबर सोमवार दुपारी 2 वाजता महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. नांदेड महापालिकेचा भष्ट कारभार. दिशाही नियोजन. शून्य मास्टर प्लॅन यामुळे महापालिकेचे धिंडवडे संपूर्ण शहरात निघत आहे. नांदेड महापालिकेच्या दुर्लक्षमामुळे शहरातील हजारो लोकांच्या घरात पाणी घुसले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास रुपये 25000 महापालिकेने द्यावेत. नांदेड शहरातील घरकुल योजनेत महागोटाळा झाला असून त्याची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि नांदेड शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर 100 कोटीचे 250 कोटीला केले. त्यामध्ये 150 कोटी चा घोटाळ्याचे वाटेकरी कोण याचा महापालिकेला जबाब विचारण्यासाठी शिवसेना महानगर च्या वतीने नांदेड महापालिकेत समोर 15 सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी 2 वाजता बोंब ...
Kalambar (B.) ; कलंबर (बु. ) येथील सरपंच म्हणून पदी सौ.मंगलाबाई सोरगे यांची बिनविरोध निवड

Kalambar (B.) ; कलंबर (बु. ) येथील सरपंच म्हणून पदी सौ.मंगलाबाई सोरगे यांची बिनविरोध निवड

नांदेड, राजकीय
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु) ता. लोहा. येथील सरपंच पदी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक असलेले उमाकांत सोरगे यांच्या पत्नि सौ. मंगलाबाई सोरगे यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कलंबर बुद्रुक येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात नावलौकिक आहे. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. येथील तत्कालीन सरपंच यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल हे प्रकरण हायकोर्ट बोम्बे बॅच औरंगाबाद यांच्या न्यायालयांत ठेवण्यात आले होते. यावेळी निकालानुसार सरपंचाचे पद रद्द करण्याचे आदेश दिले होते . त्याअनुषंगाने तहसीलदार लोहा यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन दि.८ सप्टेंबर रोजी कलंबर बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी सरपंच निवडीची प्रक्रिया ...
municipal ; मनपा हद्दीत सर्वात मोठा पाच नगरसेवक असलेला प्रभाग क्रमांक 20 ,तर प्रभाग 19 मध्ये चार

municipal ; मनपा हद्दीत सर्वात मोठा पाच नगरसेवक असलेला प्रभाग क्रमांक 20 ,तर प्रभाग 19 मध्ये चार

नांदेड, राजकीय
 नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने पालीका प्रशासनाने प्रारुप यादा प्रसिद्ध केल्या असून सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 20 असुन या मधुन पाच नगरसेवक निवडून दयावचे असुन एकुण 20 प्रभागातुन 81 नगरसेवक निवडून येणार आहेत, प्रभाग निहाय प्रारुप यादी प्रशासनाने प्रसिद्धी केली आहे, पुर्वी प्रमाणेच सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दोन प्रभागातील नगरसेवक संख्या नऊ राहणार आहे. सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने मनपा प्रशासनाने 20 प्रभाग जाहीर केले असून यात एक प्रभाग चार तर शेवटच्या विस प्रभाग मध्ये पाच असे 81 नगरसेवक निवडून येणार असून केली असून सन 2017 चा निवडणूकीचा धर्तीवर ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये 29 हजार 587 लोकसंख्या असुन वसरणी कौठा सह सिडको परिसराचा काही भाग तर 20 मध्ये 39 हजार 146 लोकसंख्या आहे ,दोन्ही प्रभागातील नगरसेवक संख्या नऊ अ...
Elections : श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

Elections : श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

नांदेड, राजकीय
नांदेड| श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली. ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, दिल्ली-110029 यांनी त्याचे पत्र दिनांक 17 जून 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक घेणेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 11 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातुन आठ, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचाल...
Government ; ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध ; ओबीसी आरक्षणाला धक्का नाही मंत्री अतुल सावे

Government ; ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध ; ओबीसी आरक्षणाला धक्का नाही मंत्री अतुल सावे

मुंबई, राजकीय
मुंबई| मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने चर्चा करून निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीस आमदार परिणय फुके, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, राष्ट्रीय महासंघ...
error: Content is protected !!