नांदेड| महापालिकेच्या गलतन कारभाराच्या निषेधार्थ नांदेड महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 15 सप्टेंबर सोमवार दुपारी 2 वाजता महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे.


नांदेड महापालिकेचा भष्ट कारभार. दिशाही नियोजन. शून्य मास्टर प्लॅन यामुळे महापालिकेचे धिंडवडे संपूर्ण शहरात निघत आहे. नांदेड महापालिकेच्या दुर्लक्षमामुळे शहरातील हजारो लोकांच्या घरात पाणी घुसले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास रुपये 25000 महापालिकेने द्यावेत. नांदेड शहरातील घरकुल योजनेत महागोटाळा झाला असून त्याची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि नांदेड शहरातील कचरा उचलण्याचे टेंडर 100 कोटीचे 250 कोटीला केले.


त्यामध्ये 150 कोटी चा घोटाळ्याचे वाटेकरी कोण याचा महापालिकेला जबाब विचारण्यासाठी शिवसेना महानगर च्या वतीने नांदेड महापालिकेत समोर 15 सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी 2 वाजता बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महानगर प्रमुख प्रकाश मारावार. मनोज यादव, शहर प्रमुख जितू सिंग टाक. अर्जुन ठाकूर आनंद जाधव, नवज्योत सिंग गाडीवाले, गजानन हरकरे, नितीन सरोदे, शैलेश रावत, गौतम जैन, ब्रिजलाल उगवे, साहेबराव मामीलवाड. निळकंठ काळे, बाया शर्मा. पिंटू सोनपे. मनोज काकडे. करण इटकल, शिरीष महाबळे. गणेश शहाणे. साहेबराव जिंकलवाड. दिलीप भागिले. मनोहर लोळगे. खाजाभाई. शेख फिरोज. विजय कल्याणकर. माधवराव कल्याणकर. गणेश पेन्सिलवार. किरण देशमुख. सुभाष शिंदे पाटील. तुलसीदास नंदाणे. बंडू देशमुख. गजू देशमुख. अंकुर पटेल. यांनी केले आहे.




