Friday, May 15

Nanded bjp Protest : आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात नांदेड भाजपकडून तीव्र आंदोलन

नांदेड| काँग्रेसने तयार केलेला हा व्हिडिओ हा राजकारणातील अध:पतनाचे उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींवर आक्षेप घेऊन काँग्रेसने मातृशक्तीचा अपमान केला असल्याचे म्हणत भाजपा महानगराध्यक्ष ,माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेस नेत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

बिहारच्या दरभंगा येथे झालेल्या काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करण्यात आली होती. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या व्यासपीठावरून मोदींच्या आईचा अपमान करण्यात आला तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला याचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देशभर काँग्रेस विरोधात निषेध नोंदवण्यात येत आहे. शनिवारी भाजपा महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा महानगराध्यक्षा सौ. ज्योती किशन कल्याणकर यांच्या वतीने शहरातील आयटीआय चौक आणि महात्मा फुले पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाची मानसिकता जनतेसमोर आणली. मातृशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

1002203755 Nanded bjp Protest : आक्षेपार्ह व्हिडिओ विरोधात नांदेड भाजपकडून तीव्र आंदोलन

या आंदोलनात भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. ज्योती कल्याणकर, उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन उमरेकर, सरचिटणीस विजय येवनकर, माजी महापौर मोहीनी येवनकर, प्रदेश उपाध्यक्षा सौ. मंगाराणी आंबुलगेकर, अनिता इंगोले ,माजी सभापती संगीता तुपेकर, प्रकाशकौर खालसा, अपर्णा चितळे, मंगला धुळेकर, कविता कळसकर, ललिता बोकारे, सुषमा थोरात, संध्या मोकाटे, कांचन ठाकूर, सुनंदा पांडे, वैशाली देबडवार, संध्या गाजरे, निलीमा सरदेशपांडे, स्नेहलता देशपांडे, संतोषी भाले,

अरुणा करखेले, पार्वती कोरडे, माया जाधव, आशदेवी पताळे, भाजपा महानगर चे सरचिटणीस शितल खांडील, अमोल कदम, सदाशिव पुरी, राजू यन्नंम, संजय मोरे, मंडळ अध्यक्ष अमित वाघ, भालचंद पवळे, आशिष नेरलकर, युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, वैजनाथ देशमुख, सुरेश लोट, प्रेम जुन्नी, राज यादव, गुरुदीपसिंघ संधू, अक्षय अमीलकंठवार, दिनेश यादव, अकबर पठाण, शिवा लोट, संतोष गोटमुखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!