HomeनांदेडKalambar (B.) ; कलंबर (बु. ) येथील सरपंच म्हणून पदी सौ.मंगलाबाई सोरगे...

Kalambar (B.) ; कलंबर (बु. ) येथील सरपंच म्हणून पदी सौ.मंगलाबाई सोरगे यांची बिनविरोध निवड

उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु) ता. लोहा. येथील सरपंच पदी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक असलेले उमाकांत सोरगे यांच्या पत्नि सौ. मंगलाबाई सोरगे यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कलंबर बुद्रुक येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्य संख्या असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात नावलौकिक आहे. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. येथील तत्कालीन सरपंच यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल हे प्रकरण हायकोर्ट बोम्बे बॅच औरंगाबाद यांच्या न्यायालयांत ठेवण्यात आले होते. यावेळी निकालानुसार सरपंचाचे पद रद्द करण्याचे आदेश दिले होते .

त्याअनुषंगाने तहसीलदार लोहा यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन दि.८ सप्टेंबर रोजी कलंबर बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी सरपंच निवडीची प्रक्रिया अध्यासी अधिकारी डी.एच.देशपांडे व ग्रामसेवक ए.व्ही.शिंदे यांनी पुर्ण केली. ग्रामपंचायत सतरा सदस्यांची असलीतरी अपात्र व गैरहजर सदस्या मुळे, उपस्थित नऊ सदस्यांनी सरपंचाची निवड केली. अनमोदक माधव मोकले यांनी सरपंच म्हणून सौ. मंगलबाई उमाकांत सोरगे यांच्या नावाचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.

निवडणूक अधिकारी यांनी नियमानुसार सदरील सरपंच म्हणून सौ.मंगलबाई उमाकांत सोरगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करून सत्कार करण्यात आला. निवडीनंतर गावातुन मिरवणुक काढुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी अध्यासी निवडणूक अधिकारी तथा पंचायत विस्तार अधिकारी देशपांडे डी. एच. , ग्रामपंचायत अधिकारी ए.व्ही. शिंदे , ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी , सपोउनि मुंडे , पोहेका , मधुकर पवार , पो का बोरकर यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments