HomeनांदेडMLA Chikhlikar : तात्काळ पंचनामे करा, नुकसानीचे प्रस्ताव सादर करा; निधीची कमतरता...

MLA Chikhlikar : तात्काळ पंचनामे करा, नुकसानीचे प्रस्ताव सादर करा; निधीची कमतरता पडणार नाही -आमदार चिखलीकर

लोहा| तालुक्यातील मागील दोन तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावस झाला नदी नाल्याना पूर आला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जनावरे दगावली पुरामुळे वाहतुक ठप्प झाली शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील पूर परिस्थिती चा आढावा घेतला. तात्काळ पंचनामे करा प्रस्ताव पाठवा, निधीची कमरता भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक करत तालुका प्रशासनाला सूचना दिल्या. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा तालुक्यातील अतिवृष्टी व उदभवलेल्या आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा आढावा लोहा तहसील कार्यालयात गुरुवारी (२१ ऑगस्ट) दुपारी एक वाजता घेतला.

बैठकीस माणिकराव मुकदम माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहन पवार, जि.प. उपअभियंता शिवाजी राठोड, नायब तहसीलदार मोकले,
माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, माजी सभापती आनंदराव शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, खुशाल पाटील,पांगरिकर दत्ता वाले, करिम शेख,वन विभागाचे वनपाल ज्ञानेश्वर हाकदळे , दिघे, यांच्यासह पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, फॉरेस्ट आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आमदार चिखलीकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला तालुक्यातील सहाही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावेत. पूरामुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करा. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. असा विश्वास शेतकरी व संबंधित विभागास दिला.

आरोग्य विभागाकडे विशेषतः लक्ष वेधून त्यांनी सांगितले की, “पूरग्रस्त भागात औषधांची कमतरता भासू नये. जर तुटवडा असेल तर तातडीने पत्र सादर करावे. आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी स्वतः संपर्क साधणार आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क असली पाहिजे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. असा इशारा त्यांनी या विभागाला दिला मतदारसंघातील कोणत्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही,”असे ठामपणे सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी शेतकरी यांनी काही महत्वाच्या सुचना केल्या

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments