Homeकरियरgraduation ceremony : हु.ज.पा. महाविद्यालय हिमायतनगर येथे पदवी वितरण समारंभ संपन्न

graduation ceremony : हु.ज.पा. महाविद्यालय हिमायतनगर येथे पदवी वितरण समारंभ संपन्न

हिमायतनगर| बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर (परिक्षा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न झाला.

महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भुषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. किरणकुमार बोंदर ( सह संचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड) हे लाभले होते. मारोतराव फुलारी कोषागार अधिकारी कोषागार कार्यालय किनवट व धोंडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर डाॅ. एल.बी.डोंगरे (CDC सदस्य), प्रा. एम.पी गुंडाळे (,Staff Secretaty), डाॅ. जी.पी.दगडे (NAAC Coordinator), प्रा. डॉ. के.बी पाटील (परिक्षा विभाग)डी सी देशमुख परीक्षा विभाग सहाय्यक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. बी. पाटील सर यानी मांडले. प्रमुख पाहुणे डाॅ. किरणकुमार बोंदर सर यांनी यशस्वी पदवीधारकांना शुभेच्छा देताना त्यांनी इथेच न थांबता आजच्या काळानुरूप आवश्यक शिक्षण घेऊन यशस्वी होण्याचा सल्ला दिला. तसेच दुसरे प्रमुख पाहुणे श्री मारोतराव फुलारी यांनी आपल्या भाषणातून विविध चढ-उतार उदाहरणे देऊन प्रत्यक्ष आपण पदवीधर झाल्यानंतर काय करावे व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

मा. प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यानी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात यशस्वी पदवीधरांचे भरभरून कौतुक केले. तसेच किती विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता या व इतर महाविद्यालयात आणि विद्यापीठात आपले पुढील शिक्षण घेत आहेत याचा लेखा-जोखा मांडला. याचे संपूर्ण श्रेय त्यांनी सर्व प्राध्यापकांना दिले व आपल्या प्राध्यापकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यशस्वी वाटचाल करण्याच्या शुभेच्छां विद्यार्थ्यांना दिल्या.

या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या B.A., B.Com., B.Sc. व M.A. च्या पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. एकूण 114 पदवीधारकाना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही .व्ही कदम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण सांवत सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments