HomeनांदेडMahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर...

Mahendra Gaikwad : पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र गायकवाड यांची फेर निवड

नांदेड| सेवाग्राम वर्धा येथे झालेल्या पत्रकार संरक्षण समितीच्या राज्यस्तरीय संमेलनात पत्रकार महेंद्र गायकवाड यांची पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली. सदरील नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे व राज्य उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ यांच्या हस्ते महेंद्र गायकवाड यांना देण्यात आले.

पत्रकार संरक्षण समिती हि संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी नोंदणीकृत संघटना असून या संघटनेचे राज्यस्तरीय संमेलन सेवाग्राम वर्धा येथे पार पडले. या संमेलनात पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली.

जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक समस्या, प्रश्न गायकवाड यांनी सोडविल्या असून पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी ते नेहमी लढत असतात. पत्रकारांवरील अन्याय, हल्ला विरोधात ते नेहमी आवाज उठवीत असता त्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी गायकवाड यांना पुन्हा संधी देत त्यांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी फेर नियुक्ती केली आहे.

धर्माबाद, देगलूर वगळता सर्व कार्यकारिणी बरखास्त….
संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सुचनेनुसार पत्रकार संरक्षण समितीची धर्माबाद व देगलूर तालुका कार्यकारिणी वगळता संपूर्ण जिल्ह्यातील तसेच जिल्हास्तरीय कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती नूतन जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी दिली असून लवकर संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार संरक्षण समितीची तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. युवा पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात पत्रकार संरक्षण समितीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन गायकवाड यांनी पत्रकारांना केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments