HomeनांदेडFlood victims, don't panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे –...

Flood victims, don’t panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीकाठची शेती पूर्णपणे जलमय झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, हळद यांसारखी पिके पाण्याखाली जाऊन शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटात प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली.

IMG 20250820 WA0026 Flood victims, don't panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

ते हिमायतनगर तालुक्यातील कोठा, कोठा तांडा, एकंबा आदी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू ठेवून आपली हकिगत मांडली. “गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस आणि पुरामुळे सगळं काही वाहून गेलं. आता उरलं त्यावर कसं जगायचं?” असा आर्त प्रश्न शेतकऱ्यांनी केला.

IMG 20250820 WA0085 Flood victims, don't panic : पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि, “पूरग्रस्तांनो घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी. पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी उघड्यावर आले असले तरी त्यांची जगण्यासाठीची लढाई सुरूच आहे. अशा वेळी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments