Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

MLA Prataprao Patil Chikhlikar : “मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, अन्यथा स्वबळावर निवडणुका” – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

MLA Prataprao Patil Chikhlikar : “मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, अन्यथा स्वबळावर निवडणुका” – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूकपूर्व तयारी पूर्ण झाली असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे, अशी माहिती मराठवाड्याचे लोकनेते तसेच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MLA Prataprao Patil Chikhlikar) यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. आमदार चिखलीकर हे किनवट दौऱ्यावर जात असताना हिमायतनगर येथे थोडावेळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “वरिष्ठ पातळीवर महायुतीची सत्ता आहे. मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करू, मात्र असा प्रस्ताव न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढविण्यास सिद्ध आहे.” यानंतर हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी...
Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?

Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?

नांदेड, राजकीय, लेख
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता "बौद्धिक क्षमता, विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी" या संकल्पना आता कालबाह्य होत चालल्या आहेत. एकेकाळी पक्षासाठी आयुष्य घालवणारा, गावोगावी जनतेच्या समस्या सोडवणारा आणि आपल्या विचारांवर ठाम राहणारा कार्यकर्ता आजच्या व्यवस्थेत अप्रासंगिक ठरत आहे. निवडणुकीच्या मैदानात आता विचार, प्रामाणिकपणा किंवा जनसेवा नव्हे—तर पैसा, थाट, लवाजमा आणि गुंडगिरी या गोष्टीच राजकारणाचे नवे मापदंड बनले आहेत. आज कार्यकर्त्यांचा वापर फक्त संख्याबळ वाढवण्यासाठी, सभांमध्ये घोषणाबाजी करण्यासाठी आणि नेत्याचे गुणगान गाण्यासाठीच मर्यादित राहिला आहे. प्रचार-प्रसार ही गोष्ट आता “इव्हेंट मॅनेजमेंट”च्या बाजारपेठेत गेलेली आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी गर्दी भाड्याने आणणारे लोक, भाषणांना टाळ्या पिटण्यासाठी तयार असलेले समूह — हे सर्व पैशावर उपलब्ध आहे. या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर, खऱ्या अर्...
Himaytnagar news : माहूर-किनवट दौऱ्यानिमित्त भाजप नेत्यांचा हिमायतनगरात सन्मान

Himaytnagar news : माहूर-किनवट दौऱ्यानिमित्त भाजप नेत्यांचा हिमायतनगरात सन्मान

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे तसेच भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर बाळासाहेब देशमुख यांनी माहूर-किनवट दौरा केला. या दौऱ्यादरम्यान हिमायतनगर येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दोन्ही मान्यवर नेत्यांची भेट घेऊन आदरपूर्वक स्वागत व सन्मान केला. त्यांच आगमन होताच फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनाच्या बळकटीकरणावर चर्चा केली असून, स्थानिक नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या झेंड्याखाली अधिकाधिक यश मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, पवन करेवाड, रामदास रायपलवार, परमेश्वर सूर्यवंशी, राम पाकलवार, नाथा पा...
Ncp Warns : हिमायतनगर तहसील व पंचायत समिती कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा!

Ncp Warns : हिमायतनगर तहसील व पंचायत समिती कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) तहसील कार्यालय व पंचायत समितीतील अनेक कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे उल्लंघन करून कामचुकार वृत्तीने काम करत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हिमायतनगर तालुका अध्यक्ष वामनराव पाटील मिराशे (वडगावकर) यांच्या निदर्शनास आली असून, त्यांनी या निष्काळजी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे व कार्याध्यक्ष अभिलाष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बोलताना वामनराव पाटील म्हणाले की, “तहसील कार्यालय आणि पंचायत समितीतील अनेक कर्मचारी रेल्वेच्या वेळेनुसार ये-जा करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत टेबलावर दिसत नाहीत, तर काही दुपारी तीननंतर गायब होतात.” ते पुढे म्हणाले, “यापुढे कोणी कर्मचारी वेळेवर हजर राहिला नाही, तर त्याचे स्वागत ‘बेशरमाच्या फुलाने’ करण्यात येईल, आणि जो कर्म...
health camp at Tamsa : तामसा येथे शेकडो रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ — दुसऱ्या शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद

health camp at Tamsa : तामसा येथे शेकडो रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ — दुसऱ्या शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद

आरोग्य, नांदेड, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| दत्ता मेघे उच्च शिक्षण व संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (वर्धा) यांच्या विद्यमाने आणि हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील तामसा येथे २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तामसा व परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर पाटील चाभरेकर होते. या वेळी मंचावर विकास देवसरकर, बबन कदम, युवा जिल्हाध्यक्ष संदेश सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शितल भांगे, हिमायतनगर तालुका अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, मंचक कदम, अशोक पवार, पांडुरंग...
Wamanrao Patil : हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी! तालुकाध्यक्ष वामनराव पाटील

Wamanrao Patil : हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी! तालुकाध्यक्ष वामनराव पाटील

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढता प्रभाव आणि नवतरुणांचा पक्षात वाढता ओघ पाहता, हिमायतनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे (वडगावकर) यांनी दिली आहे. येत्या काळात होणाऱ्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व १७ जागा स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून, यासाठी "महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठवाड्याचे लोकनेते तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ...
Another Strong Entry : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भक्कम प्रवेश!

Another Strong Entry : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भक्कम प्रवेश!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वामनराव पाटील वडगांवकर यांची निवड झाल्यानंतर पक्ष संघटना विस्ताराला वेग आला आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे विविध पक्षातील युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर राजू किसनराव गायकवाड, तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, यांनी दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक लुटे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, तसेच रवी राठोड (जिल्हा सरचिटणीस ओबीसी विभाग) उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मराठवाड्याचे लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसेच विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन...
Occasion of Diwali : दिवाळीच्या निमित्त आमदार बाबुराव कदम आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जनतेशी भेट

Occasion of Diwali : दिवाळीच्या निमित्त आमदार बाबुराव कदम आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांची जनतेशी भेट

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर येथील नागरिकांना हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर तसेच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेटी देत हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते व त्यांचा चाहता वर्ग उपस्थित होता. आमदार कदम यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले कि, “दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, जो धन-धान्याने आपल्याला स्वावलंबी आणि समृद्ध बनवतो. हा सण सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो,” असे म्हणत त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. शहरात दाखल होताच आमदार बाबुराव कदम यांनी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन शेतकरी, मजुर, नौकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समृद्धीच...
Madhavrao Patil Jabalgaonkar ; जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Madhavrao Patil Jabalgaonkar ; जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, राजकीय
हदगांव,गौतम वाठोरे l गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्याचे आदेश धडकताच निवडणूक विभागासह राजकीय पक्ष नेते मंडळी तयारीला लागले आहेत. दिपावली नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पक्षाचे नेतेमंडळी कडुन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यामध्ये महायुती बरोबर महाविकास आघाडीमध्येही युती होण्याचे संकेत कमी असल्याने प्रत्येक पक्ष आपली तयारी करीत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक पक्ष योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आपापल्या परीने मतदार संघात सर्वे करून ठरवणार असला तरी दिपावली निमित्त शुभेच्छांचे निमित्ताने मतदार संघात गाठीभेटी घेण्यावर भर देत पक्षातील नेते मंडळी मतदारसंघात पिंजून काढत आहेत. पळसा मनाठा बामणी फाटा परीसरातील पळसा मनाठा जिल्हा परिषद गटात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कव...
Hadgaon ; प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांचें हदगांव तालुक्याच्या वतीने ठिक ठिकाणी जल्लोषात स्वागत

Hadgaon ; प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांचें हदगांव तालुक्याच्या वतीने ठिक ठिकाणी जल्लोषात स्वागत

नांदेड, राजकीय
हदगांव,गौतम वाठोरे l इतिहासाचे अभ्यासक म्हणून नांदेड सह आजुबाजुच्या जिल्ह्यात सर्व परीचीत असलेले धनगर समाजाचे युवा नेते प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांची नुकतीच काँग्रेसच्या ओबीसी प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली आहे. सोमवार 19 ऑक्टोबर रोजी प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे हे नागपुर येथुन नांदेड कडे जात असताना हदगाव शहर पळसा,बरडशेवाळा येथे समाज बांधवासह विविध क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषात स्वागत केले. तर हदगांव तालुक्याच्या वतीने वडकुते पेट्रोल पंपासमोर श्रीनिवास हुलकाने यांच्या धनगरवाडा हाँटेलमध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सुनील भाऊ सोनुले, नामदेवराव जाधव, साहेबराव मेटकर, कृष्णा पवार ,यांनी स्वागत केले तर यावेळी समाज बांधवांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य दिंगाबर साखरे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश फुलारी राजवाडीकर, डॉ बि.के.निळे, पत्रकार यादव सुकापुरे, ...
error: Content is protected !!