हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर येथील नागरिकांना हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर तसेच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेटी देत हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते व त्यांचा चाहता वर्ग उपस्थित होता.



आमदार कदम यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले कि, “दिवाळी हा आनंद, उत्साह आणि ऐक्याचा सण असून, जो धन-धान्याने आपल्याला स्वावलंबी आणि समृद्ध बनवतो. हा सण सर्व नागरिकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो,” असे म्हणत त्यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. शहरात दाखल होताच आमदार बाबुराव कदम यांनी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन शेतकरी, मजुर, नौकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.



यावेळी त्यांच्या सोबत माजी खासदार सुभाष वानखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, जेष्ठ शिवसैनिक विजय वळसे, जेष्ठ शिव सैनिक सत्यवृत्त ढोले, शिवसेना नेते विकास पाटील, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील शेलोडेकर, गजानन हार्डफकर, युवासेनेचे ज्ञानेश्वर पुठेवार, दत्ता हरण, अन्वर खान पठाण, कैलास राठोड, गौरव सूर्यवंशी, प्रभाकर क्षीरसागर, साईनाथ कोमावार, राम नरवाडे, विलास वानखेडे, साहेबराव चव्हाण आदींसह शेकडो शिवसैनिक, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.



दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हिमायतनगर भेटीदरम्यान नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आपली छाप उमटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. या भेटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची उपस्थिती अधिकच ठळकपणे जाणवली.

माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही हिमायतनगर येथील नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि माजी खासदार वानखेडे यांच्या चाहत्यांनी दोघांचेही शाल पांघरून स्वागत करत शुभेच्छा स्वीकारल्या. वानखेडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नागरिकांशी संवाद साधत, त्यांच्या गळ्यात हात टाकून आत्मीयतेने शुभेच्छा दिल्या. त्यामुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.








