Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mahur Ncp : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहूर तालुका कार्यकर्णी जाहीर…!

Mahur Ncp : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहूर तालुका कार्यकर्णी जाहीर…!

नांदेड, राजकीय
माहूर l आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)तर्फे संघटनात्मक बांधणीस गती देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने विजय राठोड यांची तालुकाध्यक्ष तर सईद अली यांची माहूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माहूर तालुक कार्यकारिणीचा नुकताच विस्तार करण्यात आला  असून यामध्ये विजय राठोड यांची माहूर तालुकाध्यक्ष पदी तर सईद अली यांची शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर व किनवट माहूर विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून माहूर तालुका कार्यकरणीचा प्रश्न प्रलंबित पडला होता त्यानिमित्ताने या नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यकर्णी निवड मु...
Ncps Political Move : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय चाल — भाजपला खिंडार!

Ncps Political Move : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय चाल — भाजपला खिंडार!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वामनराव पाटील वडगांवकर यांनी पहिल्याच टप्प्यात मोठी राजकीय चाल खेळली आहे. त्यांनी हिमायतनगर भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष शीतल सेवनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दाखल करून घेतले आहे. या प्रवेशामुळे हिमायतनगरातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भाजपच्या सक्रिय युवा नेतृत्वानेच विरोधी पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे. शीतल सेवनकर हे शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे. बुधवारी शीतल सेवनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार प्रतापरा...
Himayatnagar Taluka Nationalist Party : हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्षपदी वामनराव पाटील, शहराध्यक्षपदी अमोल धुमाळे

Himayatnagar Taluka Nationalist Party : हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्षपदी वामनराव पाटील, शहराध्यक्षपदी अमोल धुमाळे

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) तालुकाध्यक्षपदी वडगाव येथील वामनराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर शहराध्यक्षपदी अमोल पाटील धुमाळे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच वरिष्ठांकडून या दोघांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. वामनराव पाटील यांनी अल्पावधीतच पक्ष संघटनेत सक्रियपणे काम करत वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी केली. वामनराव पाटील आणि अमोल धुमाळे यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांकडून अ...
Diwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

Diwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) बुधवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दीपावलीच्या निमित्ताने हिमायतनगर शहरातील व्यापारी बांधव, पक्षाचे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सर्वांना संदेश देत सांगितलं की, “प्रकाश, आनंद आणि ऐक्याचा सण असलेल्या दीपावलीने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच सदिच्छा.” शहरात आगमन होताच प्रथम त्यांनी हिमायतनगरचे ग्रामदैवत श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मतदार संघातील सर्व मायबाप जनतेच्या सुखसमृद्धीची कामना केली. हिमायतनगर शहरातील व्यापारी वर्ग, नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचा आनंद व्यक्त करत त्यांना प्रतिसाद दिला. जवळगावकर यांनी दिलेल्या दिवाळी शुभेच्छांचा वर्षाव व भेटी गाठीच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हिमायतनगर ...
MLA Pratap Patil Chikhlikar : कंधारवासीयांच्या आशीर्वादमुळेच आमदार झालो-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

MLA Pratap Patil Chikhlikar : कंधारवासीयांच्या आशीर्वादमुळेच आमदार झालो-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| मी तुमचं लेकरू असून तुमचा माझ्यावर हक्क आहे तुम्ही माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या आशीर्वादामुळेच मी आमदार होऊन यशस्वी कामगिरी बजावू शकलो. आगामी निवडणुकीत नगरपरिषद माझ्या ताब्यात द्या. शहराचा चेहरा मोहरा बदलणार अशी ग्वाही लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. कंधार शहरातील ६ कोटी ७४ लक्ष रुपयाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता आमदार चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबुराव केंद्रे उमरगेकर, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी स्वप्निल पा लुंगारे, म. जफरोद्दीन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे,मधुकर पा. डांगे, सा. बा.चे उप अभियंता सुमित पाटील, मुख्याधिकारी भोळे, मारोती गायकवाड, उत्तम पाटील जाधव, दत्तात्रय चंदनफुले, म. आसेफ, निलेश गौर, गंगा...
MLA Hemant Patil : हिमायतनगर नगरपंचायतीवर भगवा फडकेल — शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील

MLA Hemant Patil : हिमायतनगर नगरपंचायतीवर भगवा फडकेल — शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच कार्यकर्त्यांनी आजपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेत सक्रिय कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले. ते म्हणाले, “शिवसेना ही सर्व जाती-धर्मांना समान न्याय देणारी संघटना आहे. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी दिघे साहेब यांच्या विचारांवर चालणारी संघटना असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यमातून नगरविकास खात्याद्वारे हिमायतनगर शहराचा चेहरामोहरा बदलतील. जनतेने देखील आपल्या शहराचा विकास साधण्यासाठी खालपासून वरपर्यंत सत्ता एका हाती दिल्यास गावाचा कायापालट होईल.” शिवसेनेने आगामी नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक गांभीर्याने घेतली असून, प्रत्येक वार्डात नागरिकांशी संवाद, अडचणींचा आढा...
Mp Ashokrao Chavhan : संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार  माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचा विश्वास

Mp Ashokrao Chavhan : संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांचा विश्वास

नांदेड, राजकीय
नांदेड| संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ हा मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४८ विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेला मोठा मतदार संघ आहे. त्यामुळे लवकरच होवू घातलेल्या या मतदार संघाच्या निवडणुक अनुषंगाने विशेष लक्ष देवून अतिशय चिकाटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. सद्द्या सुरू असलेला दिवाळी आनंदोत्सव साजरा करण्याबरोबरच सर्वांनी आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करावी. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निश्चितपणे विजयी होणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला आहे. आगामी संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष नांदेड महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्यावतीने आज शनिवारी ( दि.१८) दुपारी २ वाजता कुसुम सभागृह येथे आयोजित करण्या...
Anand Dattatdham Ashram ; कर्तृत्ववान समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा आनंद दत्तधाम आश्रमात सन्मान

Anand Dattatdham Ashram ; कर्तृत्ववान समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा आनंद दत्तधाम आश्रमात सन्मान

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूरगड l माजी आमदार तसेच माजी सनदी अधिकारी मा. श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य, सुसंस्कृत व कर्तबगार पत्नी ज्येष्ठ समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे आनंद दत्तधाम आश्रम, श्रीक्षेत्र माहूरगड येथे भेट दिली असता त्यांचा सद्गुरु द भ प राष्ट्रसंत तथा स्वच्छता दूत महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर साईनाथ महाराज वसमतकर यांनी सन्मानपूर्वक गौरव केला नांदेड येथील अनेक महिला भगिनींसह सौ. आशाताई शिंदे या आश्रमाच्या दर्शनासाठी व राष्ट्रसंत महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांच्या आशिर्वादासाठी माहूरगड येथे आगमनास आल्या होत्या. या प्रसंगी महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर व स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आशाताई शिंदे यांनी साईनाथ महाराजांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ...
farmers affected by heavy rains : महायुती सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फसवे पॅकेज

farmers affected by heavy rains : महायुती सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फसवे पॅकेज

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाल्यानंतरही राज्यातील महायुती सरकारने फसवे पॅकेज जाहीर केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर व शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची आज भेट घेऊन निवेदन दिले व मूक आंदोलन केले. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत शेतकरीवर्ग व सर्व समाजघटकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परंतू, राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा आकडा फुगवून सांगितलेला असून प्रत्यक्षात होणाऱ्या मदतीमध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप व सरकारची काळी दिवाळी असल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या न...
Abhishek Loote :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आगामी निवडणुका स्वतंत्र लढणार – अभिषेक लूटे

Abhishek Loote :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आगामी निवडणुका स्वतंत्र लढणार – अभिषेक लूटे

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) आगामी काळात होवू घातलेल्या हिमायतनगर शहर व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याची माहिती तालूकाध्यक्ष अभिषेक लूटे यांनी दिली. हिमायतनगर तालुक्यातील सरसम व नव्याने पुनर्रचित झालेल्या पोटा बु या दोन जि.प.गट व पंचायत समितीचे कामारी, सिरंजनी, व पोटा, सरसम चार गण व तसेच हिमायतनगर नगरपंचायत निवडणुक ही जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांच्या सह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात येणार असून, सध्यातरी वरिष्ठांकडून कोणत्याही युती च्या संदर्भात गाईड लाईन्स आल्या नाहीत. जेंव्हा तसे आदेश येतील त्या प्रमाणे फेरबदल होणार असून, तुर्तास तरी स्वबळावर निवडणुका लढण्याचे आम्ही स्थानिक पातळीवर नियोजन करीत आहोत. जिल्हा परिषदेचे दोन्ह...
error: Content is protected !!