नांदेड| महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाल्यानंतरही राज्यातील महायुती सरकारने फसवे पॅकेज जाहीर केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर व शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची आज भेट घेऊन निवेदन दिले व मूक आंदोलन केले.


महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत शेतकरीवर्ग व सर्व समाजघटकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परंतू, राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा आकडा फुगवून सांगितलेला असून प्रत्यक्षात होणाऱ्या मदतीमध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप व सरकारची काळी दिवाळी असल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने राज्याचे मुख्यमंत्री,कृषीमंत्री व वित्तमंत्री यांना निवेदन देण्यात आले.



यावेळी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर,शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम,प्रदेश चिटणीस दादासाहेब शेळके,महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावनगांवकर, इंजी.सुभाष रावनगांवकर, लक्ष्मण भवरे, पांडुरंग शिंदे,गणेश तादलापूरकर,तातेराव पाटील आलेगांवकर,गजानन वाघ,नाना पोहरे,प्रकाश मुराळकर, आकांक्षा आळणे,मुमताज पठाण,संगिता सुर्यवंशी,पद्माकर काशिद,आर.डी.वाघमारे, शंकर इंगळे, इंजी.विश्वांभर भोसीकर, रंगनाथ ढवळे,रामराव पेटकर, दिगांबर पेटकर,दत्तराम वडवणे, गुलाब पठाण आदी पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




