Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Malegaon Yatra : माळेगाव यात्रेचे वैभव वाढवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज — आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

Malegaon Yatra : माळेगाव यात्रेचे वैभव वाढवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज — आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा/नांदेड| श्री क्षेत्र खंडोबारायाच्या माळेगाव यात्रेचा लौकिक अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन राज्य विधिमंडळ उपविधान समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. “माळेगाव यात्रेचा पारंपारिक अश्व बाजार देशपातळीवर प्रसिद्ध व्हावा यासाठी सर्वानी राजकारण बाजूला ठेवून सामूहिक सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. यात्रेच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली. यात्रा परिसरात माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान असलेल्या या यात्रेचे वैभव अधिक उजळवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला. १८ ते २२ डिसेंबरदरम्यान यात्रा यंदाची माळेगाव यात्रा १८ ते २२ डिसेंबर या काळात भरणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेच्या तयार...
Local bodies elections : स्थानिक स्वराज संस्था निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढवा

Local bodies elections : स्थानिक स्वराज संस्था निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढवा

राजकीय, नांदेड
नांदेड| आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारची अधिक शक्तीने निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितीत अधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे मत नांदेड जिल्ह्यातून आलेल्या विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नांदेडच्यावतीने दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातून आलेल्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माज...
Big mistake in Himayatnagar’s voter list : हिमायतनगरच्या मतदार यादीत मोठा घोळ; १५०-२०० मतदार प्रत्येक प्रभागात चुकीने दाखविल्याचा आरोप

Big mistake in Himayatnagar’s voter list : हिमायतनगरच्या मतदार यादीत मोठा घोळ; १५०-२०० मतदार प्रत्येक प्रभागात चुकीने दाखविल्याचा आरोप

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर येथील नगर पंचायत सन 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी (घोळ) (Big mistake in Himayatnagar's voter list) झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रभाग क्र. 1 ते 17 मधील मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला असून, यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे हिमायतनगर तालुका प्रमुख तथा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले राम भिमराव ठाकरे यांनी प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, सन 2016 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदार यादीचा आधार न घेता, काही कर्मचारी व अधिकारी यांनी स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून घ...
Babasaheb Patil ; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

Babasaheb Patil ; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

नांदेड, राजकीय
नांदेड l महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साईसुभाष निवासस्थानी होणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार, माजी पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हा व तालुका अध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे आणि आपल्या भागातील आढावा सादर करावा, असे आवाहन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर व नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राव...
Former MLA Jawalgaonkar : केदार ताटेवाडच्या मेहनतीमुळे संपूर्ण शहरात वृत्तपत्र वितरणाची साखळी मजबूत – माजी आमदार जवळगावकर

Former MLA Jawalgaonkar : केदार ताटेवाडच्या मेहनतीमुळे संपूर्ण शहरात वृत्तपत्र वितरणाची साखळी मजबूत – माजी आमदार जवळगावकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा — कोणतंही हवामान असो, केदार ताटेवाड याने गेल्या पाच ते सात वर्षांपासून सातत्याने नागरिकांपर्यंत विविध वृत्तपत्रांची पोहोच सुनिश्चित केली आहे. त्यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण हिमायतनगर शहरात वृत्तपत्र वितरणाची साखळी मजबूत झाली असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार जवळगावकर (Former MLA Jawalgaonkar) यांनी व्यक्त केले. ते भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त दिनांक १५ ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथील वृत्तपत्र विक्रेते केदार ताटेवाड यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यावर माध्यमांशी बोलत होते. शहरातील पत्रकार बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते ताटेवाड यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पुढे बोलताना माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले, “ग्रामीण भागातून दररोज वृत्तपत्र वितरणासाठी धडपड करणाऱ्य...
Kamari Panchayat Samiti : सौ. उज्वला त्रिरत्नकुमार भवरे कामारी पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक

Kamari Panchayat Samiti : सौ. उज्वला त्रिरत्नकुमार भवरे कामारी पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे माजाची आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांनी आपल्या सौभाग्यवती सौ. उज्वला त्रिरत्नकुमार भवरे यांची कामारी पंचायत समिती गणासाठी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली आहे. अलीकडेच पंचायत समित्या व जिल्हा परिषदेच्या जागांचे आरक्षण जाहीर झाले असून, हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जाती महिला हा प्रवर्ग निश्चित झाला आहे. त्यामुळे कामारी या एकमेव आरक्षित पं.स. गणात नवीन व जुन्या इच्छुकांची चुरस वाढण्याची शक्यता असून, सौ. उज्वला त्रिरत्नकुमार भवरे यांची दावेदारी लक्षवेधक बनली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या गणात त्यांच्या दावेदारीला उचीत पाठिंबा मिळत आहे. ...
Nanded ; नांदेड पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर

Nanded ; नांदेड पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l आगामी होणाऱ्या नांदेड पंचायत समितीसाठी आता नव्याने दोन जागा वाढल्या असून दहा जागेसाठी आता निवडणुका होणार आहेत,त्या अनुषंगाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी साठी गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यापुर्वीच पंचायत समिती नांदेड चे सभापती आरक्षण नागरीक मागास प्रवर्ग यासाठी सुटल्या आहे,अनेक गणात इच्छुकांचे स्वप्न भंगले तर काहीना खुशी तर काहींना गम झाले असून जवळपास दहा पैकी पाच जागांवर 50/टक्के महिलांना संधी मिळाली आहे. नांदेड पंचायत समिती अंतर्गत नांदेड तालुक्यातील दहा गणांचा समावेश असुन या वेळी दोन गण वाढले आहेत त्यात धनेगाव व तुप्पा या गणांचा समावेश आहे, पंचायत समिती सभापती यावेळेस आरक्षण नागरीकांच्या मागास प्रवर्ग साठी सोडण्यात आले आहे ,तर दहा पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी नांदेड कार्यालय येथे 13 ऑक्टोबर रोजी आरक्...
Mahur Reservation : माहूर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर – वाई बाजार सर्वसाधारण, वानोळा ओबीसी महिला

Mahur Reservation : माहूर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर – वाई बाजार सर्वसाधारण, वानोळा ओबीसी महिला

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कै. वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून चार गणांचे आरक्षण निश्चित झाले. वानोळा – सर्वसाधारण (महिला), हडसणी – अनुसूचित जमाती (महिला), वाई बाजार – सर्वसाधारण गोंडवडसा – इतर मागासवर्गीय (OBC) जिल्हा परिषद गटाचे आरक्षण वाई बाजार गट सर्वसाधारण,  वानोळा गट – ओबीसी असें जाहिर झाले आहे. वाई बाजार व वानोळा या दोन्ही गणांमध्ये आरक्षण सर्वसाधारण आणि ओबीसी सुटल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष आणि स्थानिक प्रभावी नेत्यांसमोर तगडे उमेदवार उभे करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आरक्षण बैठकीस पक्षप्रमुख हजर नसले तरी इच्छुक...
Join Shivsena : वडसा येथील नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

Join Shivsena : वडसा येथील नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथील असंख्य नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे नांदेड युवा सेना जिल्हा प्रमुख यश खराटे शहर प्रमुख वसीम भाई यवतमाळ अल्पसंख्यक शहर प्रमुख शेख सलमान यांच्या उपस्थितीत वडसा येथे युवा सेनेत पक्ष प्रवेश केला. तालुक्यात जिल्हा परिषद समिती निवडणूक लागल्याने नागरिकासह युवकांचा गाव खेड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे कल वाढत असल्याने ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे धुमधडाक्यात सुरू झाले असल्याने निवडणुकीत शिवसेनेचाच वर चष्मा राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने युवा वर्ग मोठ्या संख्येने युवा सेनेत दाखल होत आहे. पक्षप्रवेशात सुलतान लाला असलम खान शेख इरफान शेख मक्सुद शेख करीम सुलतान खान शेख शाहीद शेख अल्ताफ शेख अरबाज शेख सलीम शेख फैजान शेख सोहेल पार्थ कुंजपवार शेख शैजान रेहान पठाण मुसा खा मकसूद सलमान शेख मुजफ्फर शेख जलील द...
Mp ashokrao Chavhan : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची आनंद दत्त धाम आश्रम, माहूरगड येथे भेट

Mp ashokrao Chavhan : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची आनंद दत्त धाम आश्रम, माहूरगड येथे भेट

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूरगड इलियास बावानी| महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आनंद दत्त धाम आश्रम, माहूरगड येथे भेट देऊन राष्ट्रसंत गुरुवर्य साईनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार केला. अलीकडेच शासनाच्या वतीने साईनाथ महाराज यांची महाराष्ट्रातील सर्व आयटीआय संस्थांचे मार्गदर्शक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल ही विशेष भेट घेण्यात आली. आनंद दत्त धाम आश्रमाच्या वतीने अशोकराव चव्हाण साहेब यांचे स्वागत सिताराम पाटील, भाऊ पाटील, पुंडलिक सावकार, गोल्ला गोलेवार समाजाचे प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्कमवाड व भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले. कार्यक्रमास माहूर–किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. भिमरावजी केराम साहेब यांचीही उपस्थिती लाभली. या प्रसंगी अशोकराव चव्हाण साहेब यांनी आश्रम परिसराची पाहणी करून अन्नछत्रातील सेवा कार्या...
error: Content is protected !!