नवीन नांदेड l आगामी होणाऱ्या नांदेड पंचायत समितीसाठी आता नव्याने दोन जागा वाढल्या असून दहा जागेसाठी आता निवडणुका होणार आहेत,त्या अनुषंगाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी साठी गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.


यापुर्वीच पंचायत समिती नांदेड चे सभापती आरक्षण नागरीक मागास प्रवर्ग यासाठी सुटल्या आहे,अनेक गणात इच्छुकांचे स्वप्न भंगले तर काहीना खुशी तर काहींना गम झाले असून जवळपास दहा पैकी पाच जागांवर 50/टक्के महिलांना संधी मिळाली आहे.


नांदेड पंचायत समिती अंतर्गत नांदेड तालुक्यातील दहा गणांचा समावेश असुन या वेळी दोन गण वाढले आहेत त्यात धनेगाव व तुप्पा या गणांचा समावेश आहे, पंचायत समिती सभापती यावेळेस आरक्षण नागरीकांच्या मागास प्रवर्ग साठी सोडण्यात आले आहे ,तर दहा पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी नांदेड कार्यालय येथे 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालय अधिकारी सह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आरक्षण जाहीर झाल्यानंतर वाजेगाव, तुप्पा, मरळक सर्वसाधारण तर महिला सर्वसाधारण कासरखेडा, विष्णुपुरी अनुसूचित जाती महिला वाडी बु,लिंबगाव,तर नागरिक मागास प्रवर्ग धनेगाव, नागरिक मागास प्रवर्ग महिला रहाटी बु. या नुसार आरक्षण जाहीर झाले आहे.


सभापती आरक्षण नागरीक मागास प्रवर्ग साठी आरक्षीत असल्याने दोन गणातुन निवडुंन येणारा उमेदवार हा सभापती होणार असल्याने आरक्षण नंतर कही खुशी कही गम अशी अवस्था संभाव्य उमेदवार यांच्यी झाली आहे.


