नवीन नांदेड l येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एमकेसीएलच्या वतीने आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.के.सी.एल.चे मुकेश अडचित्रे यांनी एमकेसीएल तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानासंबंधी मार्गदर्शन केले.यावेळी सय्यद अखिल व संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.कविता हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कविता हंबर्डे यांनी केले. शिक्षण, उद्योग, व्यवसाय, कौशल्य यावर काम करण्याची मोलाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक या एम.के.सी.एल.च्या विविध तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी एमकेसीएलचे मुकेश अडचित्रे यांनी केले. ते पुढे म्हणाले, एन. ई .पी.- 2020 मध्ये विविध क्रेडिट कोर्सेस उपलब्ध झालेले आहेत. त्या अनुषंगाने एमकेसीएलचे विविध ॲप विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील आणि विविध क्रेडिट त्यांना प्राप्त करता येतील.


हे क्रेडिट्स नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना लाभदायक ठरतील.सय्यद अखिल यांनी विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटीच्या माध्यमातून सायबर क्राईम पासून सतर्क राहण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरी मिळवून देण्यासाठी एमकेसीएलच्या माध्यमातून मदत होते म्हणून विद्यार्थ्यांनी एमकेसीएलने सुरू केलेल्या विविध ॲपचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रो. डॉ.नागेश कांबळे यांनी केले.


या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.उत्तम कानवटे,डॉ.साहेबराव मोरे,डॉ.अनिल गच्चे, डॉ. गणेश लिंगमपल्ले,डॉ. विजयकुमार मोरे,डॉ.आर.एम. कागणे,डॉ.व्यंकटेश देशमुख,डॉ. डी. एस.पालीमकर, डॉ.साहेबराव शिंदे, डॉ. संजय गिरे, प्रा. किशोर सूर्यवाड यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


