नांदेड l महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.


ही बैठक आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साईसुभाष निवासस्थानी होणार असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.


या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार, आमदार, माजी पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हा व तालुका अध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.


बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे आणि आपल्या भागातील आढावा सादर करावा, असे आवाहन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर व नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी केले आहे.




