Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Himayatnagar Zilla Parishad Panchayat Samiti : हिमायतनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये खळबळ

Himayatnagar Zilla Parishad Panchayat Samiti : हिमायतनगर जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर; इच्छुकांमध्ये खळबळ

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जागावाटपाचे प्रारूप आरक्षण दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आले. तहसीलदार हिमायतनगर आणि उपविभागीय अधिकारी, हदगाव यांच्या वतीने अधिसूचना प्रसिद्ध होताच तालुक्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. अनेक इच्छुकांच्या राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ झाली असून काहींच्या आशांवर पाणी फिरल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या १२ जून आणि २२ ऑगस्ट २०२५ च्या आदेशानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या निर्देशांनुसार ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा परिषद सदस्यांच्या सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडला. तर हिमायतनगर पंचायत समिती आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्...
Reservation : आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; पक्षाचा आदेश की नेत्याची दिशा?

Reservation : आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; पक्षाचा आदेश की नेत्याची दिशा?

नांदेड, राजकीय
उस्माननगर, माणिक भिसे| १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर नांदेड जिल्ह्यात ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या शिस्तीचे पालन करावे की स्थानिक नेत्यांच्या आदेशानुसार काम करावे, हा मूलभूत प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे. शिराढोण जिल्हा परिषद सर्कल ‘ओपन पुरुष’ तर शिराढोण पंचायत समिती गण ‘ओबीसी महिला’ आणि हाळदा गण ‘सर्वसाधारण’ साठी सुटल्याने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक निष्क्रिय नेते व कार्यकर्ते पुन्हा मतदारसंघात सक्रिय होताना दिसत आहेत. अवकाळी पाऊस, ढगफुटी आणि अतिवृष्टीच्या नुकसानीदरम्यान काही महिन्यांपूर्वी नेते आणि कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी भेटी दिल्या होत्या. आता निवडणुकांचे वेळापत्रक जवळ येत असल्याने अनेक जण पुन्हा समाजातील संपर्क वाढवू लागले आहेत. रा...
Reservation of Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चित

Reservation of Nanded Zilla Parishad : नांदेड जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण निश्चित

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर 2025 अन्वये आरक्षण कार्यक्रम दिल्याप्रमाणे नांदेड जिल्हा परिषदेच्या एकूण 65 निवडणूक विभागाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. त्यानुसार निवडणूक विभागास आरक्षण निश्चीत करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेतील निवडणूक विभागनिहाय आरक्षणाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे दिले आहे. माहूर तालुक्यात १-वाई बा.- सर्वसाधारण, २-वानोळा- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. किनवट तालुक्यात ३-सारखणी- अनुसूचित जमाती, ४-मांडवी- नागरि...
Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाण यांची पत्रकार परिषद : अतिवृष्टी मदतपॅकेज आणि निवडणूक तयारीबाबत महत्त्वाची माहिती

Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाण यांची पत्रकार परिषद : अतिवृष्टी मदतपॅकेज आणि निवडणूक तयारीबाबत महत्त्वाची माहिती

कृषी, नांदेड, राजकीय
नांदेड| अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या विशेष मदतपॅकेजसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील भाजपा तयारीच्या अनुषंगाने खासदार अशोकराव चव्हाण यांनी महत्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली. मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेले हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मदतपॅकेज असल्याचे त्यांनी नमूद केले. ✅ पीकनिहाय मिळणारी मदत कोरडवाहू पिके – ₹8,500 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत) बागायती पिके – ₹17,000 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत) बहुवार्षिक पिके – ₹22,500 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत) रब्बी हंगामासाठी खत-बीज मदत – ₹10,000 प्रति हेक्टर (३ हेक्टरपर्यंत) यामुळे एखाद्या शेतकऱ्याला किमान ₹18,500 प्रति हेक्टर इतकी मदत मिळणा...
Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : कार्यकर्त्यांनी एक एक मत जोडण्यावर भर द्यावा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : कार्यकर्त्यांनी एक एक मत जोडण्यावर भर द्यावा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड जनमताच्या आधारे होणार असून, कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात मतदार यादी तपासणी करावी. प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधून आवश्यक हरकती दाखल कराव्यात, आणि एक एक मत जोडण्यावर भर द्यावा. असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. हिमायतनगर येथील श्री साई मंदिराच्या परिसरात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि आगामी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते, प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर याशिवाय स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इ...
Himayatnagar : हिमायतनगर प. स. सभापती पदाचे अनेकांना लागले डोहाळे… चार गणाची आरक्षण सोडत सोमवारी

Himayatnagar : हिमायतनगर प. स. सभापती पदाचे अनेकांना लागले डोहाळे… चार गणाची आरक्षण सोडत सोमवारी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी राजकीय तापमान वाढले आहे. पंचायत समितीतील सभापती पदाची सोडत जाहीर झाली असून, हे पद अनुसूचित जाती (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव सुटले आहे. त्यामुळे या पदावर बसण्यासाठी विविध पक्षांतील अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, “सभापती” होण्याचे स्वप्न अनेकांच्या डोळ्यांत आहे. हिमायतनगर तालुक्यात सध्या दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गण आहेत. सोमवारी चार पं. स. गणांची आरक्षण सोडत होणार असून, अनुसूचित जातीसाठी कोणता गण राखीव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सोडतीनंतर सभापती पद कोणत्या गणाचा होणार हे स्पष्ट होईल. गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे पंचायत समितीवर प्रशासन कारभार सुरू होता. परिणामी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक विकासकामांना विलंब झाला होता. दि. १० ऑक्टोब...
trauma care center : ट्रामा केअर सेंटर सह इतर मागण्यांचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन

trauma care center : ट्रामा केअर सेंटर सह इतर मागण्यांचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहर सर्वधर्मीय देवस्थानचे शहर असून तालुक्यातील शेतजमीन कोरडवाहू असल्याने दरवर्षी हजारो नागरिक रोजगारासाठी परप्रांतात स्थलांतर करतात तसेच माहूर शहरात भाविक लाखोच्या संख्येने येत आहेत. तसेच येणारे भाविक आणि तालुक्यातील नागरिकांच्या अपघातांचे प्रमाण वाढल्याने माहूर शहरात ट्रामा केअर सेंटर अद्यावत शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्प आणावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमदार भीमराव केराम यांचे कडे माजी नगरसेवक पत्रकार इलियास बावाणी यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माहूरला आले असता दि 11 अकरा रोजी निवेदन देऊन केली आहे. माहूर शहरात मूलभूत सुविधा उभाराव्या यासाठी अनेक मान्यवरांनी या आधी पाठपुरावा केलेला आहे स्थानिकांना रोजगार मिळावा भाविकांना माहूर गडावर येण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रो रेल्वेची जलद सुविधा मिळावी आणि अपघातग्रस...
Who is the mayor of Himayatnagar..? हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? सोशल मीडियावर इच्छुकांची चर्चा

Who is the mayor of Himayatnagar..? हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? सोशल मीडियावर इच्छुकांची चर्चा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावेळी नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणार असल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आरक्षण जाहीर होताच शहरात तसेच सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार चांगलाच चुरशीचा झाला आहे. हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? (Who is the mayor of Himayatnagar..?) सोशल मीडियावर इच्छुकांची जोरदार चर्चा होते आहे. शहरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम, टेलिग्राम यांसह स्थानिक सोशल प्लॅटफॉर्मवर “भावी नगराध्यक्ष”, “भावी नगरसेवक” अशी ओळख देत शेकडो इच्छुकांनी आपली छायाचित्रे, पोस्टर, बॅनर आणि व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या समर्थकांनी देखील ‘आमचे नगराध्यक्ष’, ‘जनतेचा नेता’, ‘आमचा उमेदवार’ भाऊच अध्यक्ष होणार..? (Discussion ...
Panchayat Samiti Chairman : जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर

Panchayat Samiti Chairman : जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत जाहीर

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली. या सोडतीत पंचायत समिती निहाय सभापती पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. भोकर- अनुसूचित जाती (महिला), हिमायतनगर- अनुसूचित जाती, किनवट- अनुसूचित जाती, उमरी- अनुसूचित जमाती, मुदखेड- अनुसूचित जमाती (महिला), नांदेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग, हदगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, नायगाव खै.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लोहा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), देगलूर- सर्वसाधारण (महिला), मुखेड- सर्वसाधारण (महिला), बिलोली- सर्वसाधारण (महिला), धर्माबाद- सर्वसाधारण (महिला), कंधार- सर्वसाधारण, अर्धापूर- सर्वसाधारण माहूर- सर्वसाधारण. या सोडत...
Zilla Parishad : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी

Zilla Parishad : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या १६ पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी या सोडत जाहिर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रांनुक्रम नियम, २०२५ नुसार ही सोडत घेण्यात येत आहे. या नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने विशेष सभा आयोजित केली आहे. अ.क्र. जिल्हा परिषदेचे ...
error: Content is protected !!