Thursday, May 21

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Flood Victims Support : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या — स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Flood Victims Support : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या — स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. तसेच जनावरांसाठी चारा, औषधे आणि निवार्‍याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात पंचनाम्याची प्रतीक्षा न करता प्रति शेतकरी ५० हजार रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी सांगितले की, “स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ही नेहमीच शेतकरी, सर्वसामान्य आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढत आली आहे. शासनाने तातडीने मदत न दिल्यास संघटना आंदोलनाचा...
Babanrao Thorat ; संकटाच्यावेळी शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी – संपर्कप्रमुख बबनराव थोरात

Babanrao Thorat ; संकटाच्यावेळी शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी – संपर्कप्रमुख बबनराव थोरात

नांदेड, राजकीय
देगलूर l मराठवाड्यात कधी नव्हे अशा भीषण ओला दुष्काळ पडला असुन या गंभीर दुष्काळात सरकार जरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असले तरी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी आहे. व राहील त्यासाठीच कुंभकर्ण झोपेचं सोंग घेणाऱ्या , गेंड्याच्या कातडीचे महा भ्रष्ट फसवणूक सरकारला जागे करण्यासाठी दि.11 आक्टोबर रोजी संभाजीनगर येथील शिवसेनेच्या वतीने हंबरडा महा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चात शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा असे आवाहन शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी देगलूर येथील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी आढावा व नियोजन बैठकीत बोलताना केले. या बाबतीत अधिक माहिती अशी की शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान, पिक कर्ज माफी, पिक विमा आदी न्याय मागण्यासाठी संभाजीनगर येथील शिवसेना पक्षप्...
Shiv Sena : देगलूर येथे तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे जोरदार निदर्शने — शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन संपन्न

Shiv Sena : देगलूर येथे तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे जोरदार निदर्शने — शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन संपन्न

नांदेड, राजकीय
देगलूर (गंगाधर मठवाले) शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख माजी विरोधी पक्षनेते मा. श्री अंबादास दानवे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख मा. श्री भुजंग पाटील तसेच सहसंपर्कप्रमुख मा. श्री दयाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथे आज (दि. 9 ऑक्टोबर) तहसील कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. ओला दुष्काळ घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे, पीककर्ज माफ करावे, तसेच पीकविमा मंजूर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार भरत सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे (खुतमापुरकर), शहरप्रमुख संजय जोशी...
Shiv Sena’s drum beat : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

Shiv Sena’s drum beat : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

नांदेड, राजकीय
किनवट/श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांच्या काठावरील शेती पाण्याखाली जाऊन पिके खरडून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफीसह प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत दिवाळीपूर्वी वितरित करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे किनवट माहूर तालुक्या च्या वतीने येथे दि 8 रोजी तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते व नांदेड-हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख उमे...
Reservation : हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — महिलांचा दबदबा!

Reservation : हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — महिलांचा दबदबा!

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण "सर्वसाधारण (ओपन)" वर्गासाठी जाहीर झाले असून, या घोषणेनंतर नगरपंचायतीच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. आरक्षण जाहीर होताच शहरातील भावी नगराध्यक्ष पदाचे सुमारे १७ संभाव्य उमेदवार आपापल्या गोटात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.  आरक्षण सोडतेचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर वं नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आगामी दिवाळीच्या नंतर निवडणुकीचा बिगुल वाजला असून,  आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, नगरपंचायतीच्या १७ वार्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे. हिमायतनगर नगरपंचायत वार्डनिहाय आरक्षण 1️⃣ वार्ड क्र. 01 — खुला महिला (Open – महिला) 2️⃣ वार्ड क्र. 02 — खुला (Open) ...
Announcement of reservation : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

Announcement of reservation : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

राजकीय, नांदेड
मुंबई| राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नगरपरिषद आरक्षण पुढील प्रमाणे :- नगर परिषदांमधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित पदे (एकूण 33 पदे) अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित नगरपरिषद (17 पदे)- देऊळगाव राजा,2. मोहोळ,3. तेल्हारा, 4. ओझर, 5. वाना डोंगरी (नागपूर), 6. भुसावळ, 7. घुग्घुस,...
Politics :हदगाव नगरपरिषदेस “सर्वसाधारण महिला” आरक्षण — अनेक दिग्गज पुरुषांना धक्का!

Politics :हदगाव नगरपरिषदेस “सर्वसाधारण महिला” आरक्षण — अनेक दिग्गज पुरुषांना धक्का!

नांदेड, कृषी, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सोमवारी मुंबई येथे नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार हदगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पद “सर्वसाधारण महिला” या गटासाठी राखीव ठरले आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षपदाच्या तयारीत असलेल्या अनेक दिग्गज पुरुष इच्छुकांना मोठा धक्का बसला असून राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक पुरुष नेत्यांनी दीर्घकाळ तयारी केली असताना त्यांच्या आशांवर क्षणात पाणी फिरले आहे. महिला सत्तेची हॅटट्रिक? हदगाव नगरपरिषदेत याआधीही दोन वेळा महिला नगराध्यक्षा होत्या. यंदाही तीसऱ्यांदा महिला नगराध्यक्षा विराजमान होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक महिला विरुद्ध महिला अशा रंगात रंगण्याची दाट शक्यता आहे. “महिला सक्षमीकरणाचा न...
Reservations for the post of Mayor : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन — दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार!

Reservations for the post of Mayor : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन — दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार!

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई, नांदेड, हिमायतनगर, अनिल मादसवार | राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. या सोडतीत हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ( Reservations for the post of Mayor) ओपन (खुल्या प्रवर्गासाठी) घोषित करण्यात आले आहे. आरक्षणाची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. दिवाळीनंतरच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिमायतनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १० जानेवारी २०१६ रोजी पार पडली होती. त्या वेळी काँग्रेसने नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. पुढील काळात नगराध्यक्ष पदावरून मोठ्या राजकीय हालचाली आणि बंडखोरी झाल्याने सत्तेत बदल झाला आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडला गेला. मात्र २४ जानेवारी २०२...
Mayor’s post reserved for OBCs : माहूर नगर पंचायतीत ओबीसी राज! नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव

Mayor’s post reserved for OBCs : माहूर नगर पंचायतीत ओबीसी राज! नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर नगर पंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाचा तक्ता नुकताच जाहीर झाला असून, पुढचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. या निर्णयानंतर माहूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी आतापर्यंत विविध प्रवर्गातील इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र आरक्षणाच्या घोषणेनंतर अनेकांचे राजकीय स्वप्न धुळीस मिळाले आहे. दुसरीकडे, ओबीसी प्रवर्गातील तीन प्रमुख इच्छुकांमध्ये मात्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माहूर शहरात गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाचे मजबूत राजकीय अस्तित्व असून, या आरक्षणामुळे आगामी निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता नगराध्यक्षपदावर कोण बसणार, हे पाहण्यासाठी माहूरकर उत्सुक आहेत....
Reservation : पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी

Reservation : पंचायत समित्यांच्या राखीव सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्‍हयातील 16 पंचायत समित्‍यांसाठी राखीव ठेवावयाच्‍या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत शुक्रवार 10 ऑक्‍टोबर 2025 रोजी दुपारी 3 वा. नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काढण्‍यात येणार आहे. सर्व इच्छुक नागरिकांनी उपस्थितीत राहण्‍याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला) ( अनु. जाती, अनु.जमाती, नामाप्र महिलांसह) राखीव ठेवावयाच्‍या तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्‍या सभापती पदांची संख्‍या पुढील प्रमाणे निश्चित करून दिली आहे. प्रवर्ग व राखीव जागा संख्या अनुसूचित जाती : 2 जागा. अनुसूचित जाती (महिला) : 1 जागा. अनुसूचित जमाती : 1 जागा. अनुसूचित जमाती (महिला) : 1 जागा. नागरिकांचा मागास प्रवर्ग : 2 जागा. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : 2 जागा. सर्वसाधारण : 3 जागा. ...
error: Content is protected !!